शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:09 IST

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीच्या ठीकाणी सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या

इंदापूर : इंदापूर येथे जगतगूरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीच्या ठीकाणी सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मैदानातील रिंगण सोहळ्यात दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरीस गेली. तर इंदापूर बारामती बायपास चौक येथे संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेताना सव्वा दोन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी व एकाच वेळेस घडल्या असून याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश सुर्यभान धोरकट (वय ५९, रा.अक्षय अनंत अपार्टमेंट, दत्तनगर इंदापूर) व बबन ज्ञानदेव जगताप (वय ६५ रा.सरस्वतीनगर इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे.

 पहिल्या घटनेत शनिवार दि.२ जुलै रोजी धोरकट हे कुटुंबीयासह संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी अकलुज येथील बारामती बायपास चौक येथे सकाळी गेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळे वजनाची व सव्वा लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. असे धोरकट यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.  दुसऱ्या घटनेत शनिवार दि.२ जुलै रोजी सकाळी सुमारास इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील रिंगण सोहळ्यात चोरीचा प्रकार घडला. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची व एक लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. असे जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. वरील दोन्ही घटना या एकाच दिवशी व एकाच वेळेला घडल्या आहेत. यामध्ये एकुण सव्वादोन लाख रूपये किंमतीचे व साडेचार तोळे वजनाचे सोने चोरीस गेले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीPoliceपोलिसArrestअटकIndapurइंदापूर