शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर आर्केस्ट्राचा कल्ला ; घरात चोरट्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:15 IST

फिर्यादी दोन्ही दरवाजे बंद करून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यास गेले होते.

ठळक मुद्दे१४ हजार रुपये, सोन्याचे दागिने, मोबाईल असा ६९ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास

राजगुरुनगर: निमगाव खंडोबा (ता खेड ) येथे अज्ञात चोरट्यांनी घराची कौले काढून घरामध्ये प्रवेश करून सोने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकोणसत्तर हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.याबाबत द्वारका शंकर वायकर (वय५३, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , बुधवारी (दि.११ ) दत्तजयंती उत्सवानिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम गावात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम घरासमोरच होता. कार्यक्रम पाहण्यासाठी रात्री ११ वाजता द्वारका वायकर व त्यांचे पती शंकर वायकर हे घराच्या पाठीमागील दरवाजाला आतून कडी लावून व समोरील दरवाजाला कुलूप लावून असे दोन्ही दरवाजे बंद करून ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम पाहण्यास गेले होते. दरम्यान, सकाळी लवकर शेतात कामाला जायचे असल्याने हे दोन्ही पती-पत्नी पावणेबाराच्या सुमारास पुन्हा घरी आले त्यांनी कुलूप उघडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दार उघडले नाही. दाराला आतमधून कडी लावली असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. घराच्या मागील दरवाजाकडे त्यांनी जाऊन पाहिले असता मागील दरवाची बाहेरून कडी लावलेली होती. ती कडी उघडून घरात प्रवेश केला असतास दारासमोरच भिंतीलगत ठेवली धान्याच्या पोत्यामधील गहू व तांदूळ सांडलेले दिसले. तसेच हॉलमधील लोखंडी कपाट उघडे होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या पोटमाळ्यावरील घरांची ४ कौले काढून आर्केस्ट्रा कार्यक्रमाचा आवाजाचा फायदा घेऊन कौलावाटे घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख रक्कम १४ हजार रुपये, व सोन्याचे दागिने, मोबाईल असा ६९ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. पुढील तपास पोलिस हवालदार एस. एन. घोडे करत आहे.  

टॅग्स :KhedखेडtheftचोरीThiefचोरPoliceपोलिस