शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून गॅसची चोरी; काळ्या बाजारात विक्री करणारे तिघे अटकेत, तब्बल १ कोटींचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 15:37 IST

गॅस काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असताना पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील रासे येथे गॅसच्या टँकरमधून गॅस चोरी करून तो काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असताना पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.         नरसिंग दत्तू फड (वय ३१, रा. धसवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), अमोल गोविंद मुंडे (वय २८, रा. वागदरवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), राजु बबन चव्हाण (वय ५२, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची कारवाई रविवारी मध्यरात्री करण्यात आली. नरसिंग आणि अमोल यांना इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथून रासे येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचा गॅस टॅंकर आणण्याबाबत परिवाहक म्हणून नेमले आहे. त्या दोघांनी मुंबई येथून रासे येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचे दोन टँकर चाकण येथे घेऊन जाणे अपेक्षित असताना ते टाळले. तसेच जाणीवपूर्वक वाहतुकीदरम्यान दोन गॅस टँकर मधून गॅस काढून घेण्यासाठी आरोपी राजू याला संमती दिली. 

दरम्यान राजू याने त्याच्याकडील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने गॅस टॅंकर मधील गॅस चोरून घेतला. चोरीचा गॅस काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने, मानवी जीवन धोक्यात येईल अशा प्रकारच्या हयगयीने तो साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास कारवाई करत तब्बल १ कोटी १० लाख पाच हजार १४५ रुपये किमतीचा गॅस जप्त केला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक