डोळ्यांच्या दवाखान्यातून २ लाख ३५ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:26+5:302021-06-18T04:08:26+5:30

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) माणिकबाग परिसरातील डोळ्यांचा दवाखाना व मोतीबिंदू सेंटरचा कोयंडा तोडून चोरट्याने २ ...

Theft of 2 lakh 35 thousand from eye hospital | डोळ्यांच्या दवाखान्यातून २ लाख ३५ हजारांची चोरी

डोळ्यांच्या दवाखान्यातून २ लाख ३५ हजारांची चोरी

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) माणिकबाग परिसरातील डोळ्यांचा दवाखाना व मोतीबिंदू सेंटरचा कोयंडा तोडून चोरट्याने २ लाख ३५ हजार रुपये चोरून नेले.

याप्रकरणी डॉ. दीपक पाठक (वय ४२, रा. नांदेड सिटी) यांनी सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

डॉ. पाठक यांचे क्लिनिक १५ जून रोजी सायंकाळी बंद केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जून रोजी सकाळी क्लिनिक उघडायला गेले असताना त्यांना क्लिनिकचा दरवाजाचा कोयंडा तोडलेला दिसला. चोरट्याने घरफोडी करून ड्रावरमधील २ लाख ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे तपास करीत आहेत.

-------------------------

उंड्रीत घरफोडीत ७० हजारांची चोरी

उंड्रीतील वडाचीवाडी येथील बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, ४६ तोळे चांदीचे दागिने व रोकड असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी ज्ञानोबा श्रीपराव फड (रा. वडाचीवाडी, उंड्री) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर १० ते १५ जून या कालावधीत बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कट करून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमच्या कपाटातील ऐवज चोरी केला. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft of 2 lakh 35 thousand from eye hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.