शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युपश्चातही कलाकार उपेक्षितच : शरद तळवलकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाट्य वर्तुळाला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:38 IST

शरद तळवलकर हे असेच एक झाकोळले गेलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1 नोव्हेंबरला सांगता झाली.

नम्रता फडणीसपुणे :  महाराष्ट्रातील रसिकांच्या चेह-यावर हास्याची लेकर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा पडलेला विसर,मुलुंडच्या नाट्य संमेलनात प्रसाद सावरकर यांना जिवंतपणी वाहाण्यात आलेली श्रद्धांजली..रंगभूमीसाठी आयुष्य समर्पित करणा-या पडद्यामागीलकलाकारांच्या वाट्याला मृत्यूपश्चात्य येणारी ‘उपेक्षा’ यांसारख्या घटनांना रंगकर्मींच्या माहिती संकलनाचा अभाव ही गोष्ट प्रकर्षाने कारणीभूत ठरत आहे. इतक्या वर्षांमध्ये रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन करण्यासंबंधी मध्यवर्ती नाट्य परिषदेसह इतर शाखांनी गांभीर्याने कोणतीच पावले उचलली नसल्यामुळे नाट्य वर्तुळामधून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. मध्यवर्तीसह परिषदेच्या शाखांकडेही कलाकारांच्या माहितीचा अभाव असल्याचेच बहुतांश वेळेला पाहायला मिळाले आहे.  कलाकारांच्या माहितीचे संकलन ही आता काळाची गरज बनलेली असतानाही मध्यवर्तीने अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या दुर्लक्षिततेमुळे अनेक रंगकर्मींचे  योगदान समाजापर्यंत पोहोचू शकलेले नाही.

                     शरद तळवलकर हे असेच एक झाकोळले गेलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 1 नोव्हेंबरला सांगता झाली.  मात्र त्याचामध्यवर्ती नाट्य परिषदेला पत्ता देखील लागला नाही. रंगभूमीवरील विष्णूदास भावे या प्रतिष्ठित सन्मानाचे तळवलकर हे मानकरी ठरले होते. मात्र तरीही तळवलकर यांच्याबाबत मध्यवर्तीकडे कोणतीच माहिती उपलब्ध नसणे ही दुर्देवी गोष्ट आहे.   यापूर्वी मध्यवर्तीसह पुणे शाखेने कलाकारांच्या मुलाखतीस्वरूपात डॉक्यूमेंटेशनचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत मान्यवर कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन करण्यात आले; मात्र नंतर तो प्रकल्पकाहीसा ठप्पच झाला.  यापुढील काळात तरी रंगकर्मींच्या माहितीचे संकलन करण्यात यावे अशी मागणी नाट्य क्षेत्रामध्ये जोर धरत आहे. दरम्यान, नाट्य परिषद पुणे शाखेच्या नवीन कार्यकारिणीने ही काळाची गरज लक्षात घेऊन ‘कलाकारांची सूची’ तयार केली असून,  रंगभूमी दिनानिमित्त या सूचीचे दि. 15 नोव्हेंबरला प्रकाशन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषद पुणे शाखेचे उपाध्यक्ष दीपक रेगे यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कलाकारांची माहिती संकलित करण्यासंबंधी नक्कीच पावले उचलली जातील

पूर्वी मध्यवर्तीने 25 ते 30 कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन केलेले होते. मुळातच शरद तळवलकर यांची जन्मशताब्दी कुणीच केली नाही, ती संपल्यावरअनेकांच्या लक्षात आल्या. त्यावेळच्या कलाकारांचा डेटा आज फारसा कुणाकडेच उपलब्ध नाही. पण कलाकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे गरजेचे आहे हे मान्यच आहे. त्यामुळे पुढील काळात कलाकारांची माहिती संकलित करण्यासंबंधी नक्कीच पावले उचलली जातील. 

प्रसाद कांबळी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदकलाकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे हे आवश्यकचकलाकारांचे डॉक्यूमेंटेशन होणे हे आवश्यकच आहे. आम्ही जे कलाकारांचे मेळावे घेतले त्यामध्ये कलाकारांचे नाव, जन्मतारीख, त्यांचे रंगभूमीवरचेयोगदान अशी माहिती भरून घेत आहोत.  शाखेतर्फे 450  कलाकारांची सूची आम्ही तयार केली आहे, रंगभूमी दिनानिमित्त येत्या 15 नोव्हेंबरला तीप्रकाशित करीत आहोत. त्यादिवशीही कलाकारांना आम्ही माहिती देण्यासंबंधी आवाहन करीत आहोत.

- दीपक रेगे, उपाध्यक्ष, नाट्य परिषद पुणे शाखा

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक