उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन व्यवहाराची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली असून या व्यवहारात पैशाची देवाण-घेवाण झालीच नसल्याची माहिती दिली. यामुळे समोरच्या पार्टीने ह सगळे कसे काय केले याची चौकशी करण्यात येणार आहे, तसेच यामध्ये कोणी कोणाची फसवणूक केली हे समोर येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज
'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातमी मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम असते, असा टोलाही पवार यांनी विरोधकांना लगावला. "एकदा चौकशी होऊ द्या. एकनाथ शिंदे यांनीही तेच सांगितले आहे. या प्रकरणाची समिती बारकाईने चौकशी करेल. जमिनीचा व्यवहार झाला होता पण त्यांना अजून पझेशन मिळाले नव्हते. सरकारी जमिनीचे व्यवहार होताच कामा नये, सरकारी अधिकाऱ्यांनी ते थांबवायला पाहिजे होते, असे अजित पवार म्हणाले.
"पुन्हा अशा पद्धतीच्या जमिनींचे व्यवहार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. या प्रकरणी विकास खरगे यांची टीम तपास करेल. आपल्या राज्याचा टॅक्स बुडता कामा नये, असंही अजित पवार म्हणाले. मी प्रशासनाला कालच एक सल्ला दिला. माझ्या जवळचे, लांबचे नातेवाईक अशा पद्धतीने व्यवहार किंवा कामे करत असतील तर कोणाच्याही दबावाल घाबरू नका. नियमावर बोट ठेवूनच काम करा, असे मी सांगितले आहे. माझे कालपर्यंत उशीरापर्यंत काम सुरू होते, मी आज पुण्याला आलो. पार्थ मुंबईत आहे. मी त्याला भेटून सांगणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
"या व्यवहारात एक रुपयाही दिलेला नाही"
यावेळी पत्रकारांनी एवढी मोठी गुंतवणूक करत असताना तुम्हाला त्याची माहिती दिली होती का? असा प्रश्न केला. यावेळी अजित पवार म्हणाले, या प्रकरणात एक रुपयाचीही गुतंवणूक केलेली नाही, मी या प्रकरणातील सगळे काही बघितले. एक रुपया न घेताही समोरच्या पार्टीने कसे काय एवढे केले. आता यामध्ये कोण फसले आहे याची चौकशी केली जाणार आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Web Summary : Ajit Pawar clarified that no money was exchanged in his son's land deal. An inquiry will investigate potential fraud and procedural lapses by officials. He emphasized transparency and warned relatives against exploiting his position.
Web Summary : अजित पवार ने स्पष्ट किया कि उनके बेटे के जमीन सौदे में कोई पैसा नहीं दिया गया। एक जांच संभावित धोखाधड़ी और अधिकारियों द्वारा प्रक्रियात्मक चूक की जांच करेगी। उन्होंने पारदर्शिता पर जोर दिया और रिश्तेदारों को अपनी स्थिति का फायदा उठाने के खिलाफ चेतावनी दी।