शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

टोमॅटोच्या पिकाची साथ; जुन्नरमधील दाम्पत्य एकाच पिकात करोडपती, तब्बल २ कोटी मिळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:42 IST

शेतकरी दाम्पत्याला १२ एकर टॉमेटो लागवडीतून दोन महिन्यात तब्बल दोन कोटी तीस लाख रुपये आत्तापर्यंत उत्पन्न मिळवले

ओतूर : सातत्यपूर्ण मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन असेल, तर शेतकरी कोट्यधीश होऊ शकतो. जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील शेतकरी ईश्वर गायकर आणि पत्नी सोनाली गायकर यांनी अलीकडे टोमॅटो पिकातून जे यश मिळवलं आहे ते हेच अधोरेखित करते. टोमॅटोने या शेतकरी दाम्पत्याला १२ एकर टॉमेटो लागवडीतून दोन महिन्यात तब्बल दोन कोटी तीस लाख रुपये आत्तापर्यंत उत्पन्न मिळवले आहे.

ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर या दाम्पत्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतीसाठी आवश्यक सर्व कच्चा माल आणि हवी ती साधनसामग्री पुरवण्याची जबाबदारी ईश्वर यांनी घेतली, तर बारावी सायन्स पूर्ण केलेल्या सोनालीने शेती मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ, हवामानाचा आणि इतर गोष्टींचे नियोजन यांची जबाबदारी सांभाळत गेली. कित्येक वर्षे हे शेतकरी दाम्पत्य टोमॅटोचे पीक घेत आहे.        कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ संजय नवले आणि गोपीनाथ दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एप्रिल महिन्यात बारा एकर क्षेत्रामध्ये ६२४२ सिजेंटा या ६०,००० टोमॅटो रोपांची लागवड केली. आणि योग्य नियोजन करून टोमॅटोचा भाग बहरात आणली. ज्यावेळी टोमॅटोला फळधारणा चालू झाली आणि नशिबाने साथ दिली टोमॅटो पिकाचे भाव गगनाला भिडले गायकर यांची टोमॅटो मार्केटमध्ये दाखल झाली. आणि बघता बघता ते टोमॅटो उत्पादनातून करोडपती झाले. गेल्या तीन वर्षात एकदाच, म्हणजे दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये लहरी हवामानामुळे त्यांचे नियोजन वाया गेले होते. १६ ते १७ लाख रुपये भांडवल घालून ते अंगावर आले तर २०२२ ला टॉमॅटो पिकाने जवळपास २० लाख रुपये मिळवून दिले.    तर यंदा २०२३ ला १३,१४,१५ एप्रिलला १२ एकर क्षेत्रात शेताची चांगली मशागत करून बेड पाडून मल्चिंग पेपरवर ६० हजार टोमॅटो रोप लागवड केली. योग्य तो पाणी मात्रा, खते औषधे, फवारणी, मांडव करणे, टोमॅटो बाधणी, मजुरी असे एकूण ४० लाख रुपये भांडवल गेले. तर आता पर्यंत १५ टोमॅटो तोडे झाले असून १५ हजार कॅरेट गेले असून आता पर्यंत २ कोटी ३० लाख रुपये झाले आहेत. अजून पुढे ६ ते ७ हजार कॅरेट जातील असा अंदाज आहे. तर १ दिवसाला १८०० कॅरेट गेली असून सर्वात जास्त बाजार २३११ रूपये कॅरेटला बाजार नारायणगाव उपबाजार येथे मिळाला असून तर सर्वात कमी बाजार ६६० रूपये मिळाला आहे. तरी एवढे उत्पन्न व बाजार मिळाला आम्ही समाधानी आहोत. तसेच आमचे वडील तुकाराम गायकर यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभले चांगली शेती पिकवण्यामागे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे असे ईश्वर गायकर व सोनाली गायकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरvegetableभाज्याMONEYपैसाhusband and wifeपती- जोडीदार