शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकराव्या दिवशी राज्य शासनाला आली जाग! ससून ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 10:01 IST

डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती...

पुणे : ड्रग्ज रॅकेट उघडकीस येऊन 11 दिवस उलटल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाला आता जाग आली आहे. ससून रुग्णालयातील ड्रग्ज आणि सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशिरा काढले. तसेच येत्या १५ दिवसांत हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून  रुग्णालयात उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेट आणि कैद्यांना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील अद्याप फरार आहे. राज्य शासनाने आता या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण आणि त्यासंबधीत घटनेबाबत सविस्तर चौकशी करणार असून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.त्रयस्थ समिती हवी-

दरम्यान या समितीमधील अध्यक्ष ते सदस्य सर्वजण वैद्यकीय शिक्षण विभागातील आहेत. त्यामुळे निष्पक्ष चौकशी आणि कारवाई होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे या क्षेत्रातील सुत्रांचे मत आहे. 

... अशी असेल समिती-१) अध्यक्ष - डॉ. दिलीप म्हैसेकर, (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई)२) सदस्य - डॉ. सुधीर देशमुख, (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर)३) सदस्य - डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक व विभागप्रमुख, न्यायवैद्यक शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड)४) सदस्य - डॉ. एकनाथ पवार, प्राध्यापक व विभागप्रमुख, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई)

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी