शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

खंडोबा मंदिराला भेटल्या शिखरी काठ्या;दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:09 IST

चांदीच्या पालख्यांची मिरवणूक काढून त्या ग्रामदैवत जानुबाई ईव व खंडोबाला भेटवल्या

जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेसाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.. च्या जयघोषात, मुक्त हस्ताने भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी देवदर्शन उरकले, तर मानाच्या काठ्यांनीही देवभेटीचा सोहळा उरकला.मुंबई परिसरातून आलेल्या कोळी बांधवांच्या चांदीच्या पालख्यांची मिरवणूक काढून त्या ग्रामदैवत जानुबाई व खंडोबाला भेटवण्यात आल्या, तर गुरुवारी सकाळी संगमनेर येथील होलम राजा दुपारी सुपे (बारामती) येथील खैरे काठीने स्थानिक होळकर काठी खंडोबा गडाचा मान स्वीकारला.

खंडोबा गडावर मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, अॅड. विश्वास पाणसे, अॅड. पांडुरंग थोरवे, व्यवस्थापक आशिष बाठे, आदी उपस्थित होते. त्यांनी होलम राजा काठीचे मानकरी तुकाराम महाराज काटे, जेजुरी येथील होळकर काठीचे बबन बयास, देविदास बयास, सागर गोडसे, सचिन नातू, बाळू नातू, मिलिंद माने, तसेच सुपे (ता. बारामती) येथील खैरे काठीचे शहाजी खैरे, आबा खैरे, शरद खैरे, भगवान खैरे, देविदास भुजबळ, अमोल अपसुंदे, नवनाथ लांडगे, रामनाथ ढिकले, आदी मानकऱ्यांचा सत्कार केला. यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी कमी होती. चावडीवर झाला मानपानसकाळी नऊ वाजता होलम राजा यांच्या समवेत मानाच्या अन्य प्रासादिक काठ्यांची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. चावडीवर मानपान झाल्यावर काठ्या खंडोबा गडामध्ये आल्या. विविध रंगाची आकर्षक कापडी निशाने असलेल्या मानाच्या काठ्या भक्त आनंदाने नाचवत होते. होलम काठीने ११ वाजता देव भेट उरकली. यानंतर दुपारी सुपे येथील खैरे यांची मानाची काठी, होळकरांची मध्यस्थ काठी व इतर प्रासादिक काठ्यांची मंदिराला भेट झाली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा