शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या
2
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
3
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
5
AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५.४ षटकांत मिळवला 'मोठ्ठा' विजय; सुपर-८ चे तिकीट कन्फर्म
6
'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत
7
AUS vs NAM : नवख्या संघाला ऑस्ट्रेलियानं स्वस्तात गुंडाळलं; कांगारूंचा दबदबा कायम, झाम्पाचा 'चौकार'
8
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही
9
केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका
10
SL vs NEP : पावसानं श्रीलंकेला बुडवलं! दक्षिण आफ्रिकेची चांदी; पाकिस्तानची डोकेदुखी वाढली
11
उद्धवसेना-काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी, विधान परिषद निवडणुकीचे निमित्त
12
फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका
13
गुंतवणुकीचा ओघ आटला, ४४ लाख एसआयपी बंद, अकाऊंट बंद करण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत ८८% वाढले
14
जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट
15
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
16
Palghar: भ्रष्टाचाराच्या पैशांवरून अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, जव्हार कृषी विभागात घडला प्रकार
17
मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र
18
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
19
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
20
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले

पुणे महापालिकाच दररोज नदीत सोडते साडेचारशे एमएलडी सांडपाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:28 PM

प्रक्रिया करणाऱ्या प्लांटची कमतरता : जायका प्रकल्पातील केंद्रांसाठी वाट पाहावी लागणार

श्रीकिशन काळे

पुणे : शहरात दररोज ८८९ एमएलडी सांडपाणी तयार होत आहे. यामधील केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते, इतर ४३९ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळेच नदीची गटारगंगा झाली आहे. हेच पाणी पुढे उजनीकडे जाते आणि तेथील शेतीवर, जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लवकरात लवकर सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया केली, तरच नदी स्वच्छ पाण्याला घेऊन प्रवाही राहणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात नदीचे प्रदूषण ही मोठी गंभीर समस्या बनली आहे. मुठा नदीत दररोज कित्येक एमएलडी सांडपाणी आणि कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी रसायनमिश्रित पाणी नदीत जात असून, ते पुढे भीमा नदीत मिसळत आहे. ज्याचे परिणाम उजनी धरणात बघायला मिळत आहेत. हे रोखण्यासाठी पुणे शहरात निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जाणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.

पुणे शहर खूप वेगाने विस्तारत असून, त्याप्रमाणात पाण्याची मागणी वाढत आहे. आता मुबलक पाणी मिळत असले, तरी भविष्यात टंचाई निर्माण होऊ शकते. येत्या काही वर्षांत पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढेल आणि त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

आणखी २३ गावांचे सांडपाणी वाढणार

शहरात दररोज ७५० एमएलडी व अकरा गावांतील १३९ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यात आता २३ गावांचा समावेश पुण्यात झाला आहे. त्यामुळे त्यांचे सांडपाणी अद्याप किती निर्माण होते, त्याची आकडेवारी आलेली नाही. एकूणच पुण्याचा वाढता विस्तार पाहता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र वाढविणे हेच आवश्यक आहे.

मार्च २०२५ मध्ये हे प्लांट सुरू होतील

जायका प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ११ एसटीपी प्लांट तयार करण्यात येत आहे. हे काम तीन वर्षे चालणार असून, मार्च २०२५ मध्ये हे प्लांट सुरू होतील. त्यातून ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. - जगदीश खानोरे, जायका प्रकल्प, महापालिका

दररोज ७५० एमएलडी पुणे शहरात सांडपाणी निर्माण होते

दररोज ७५० एमएलडी पुणे शहरात सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी ४५० वर प्रक्रिया केली जाते. सध्या १० प्लांटमध्ये हे काम सुरू आहे. त्यातील नायडू रुग्णालयातील जुना प्लांट पाडण्यात येत आहे. त्यामुळे तेथील पाणी नव्या नायडूच्या प्लांटमध्ये वळविण्यात आले आहे. - प्रमोद उंडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

नदीत सांडपाण्यातून पेस्टीसाइड्स, हेवी मेटल्स

दररोज ४३९ एमएलडी सांडपाणी थेट नदीत जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित बनली असून, त्याचा परिणाम पुढील गावांवर व उजनी धरणावर होत आहे. नदीत पेस्टीसाइड्स व हेवी मेटल्स जात आहेत. त्याचा भयंकर परिणाम होतो. जनावरे पाणी पीत असतील, तर ती घातक रसायने त्यांच्या दुधाद्वारे आपल्या पोटात जातात. त्यामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्वचारोग, केस गळणे, गर्भावर परिणाम होणे आदी आजारांचे प्रमाण वाढते. - डाॅ. प्रमोद मोघे, माजी शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

उपाय काय ?

- दररोज सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणे.- नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे.- नदीत कचरा टाकणे बंद करणे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीriverनदीSocialसामाजिकbusinessव्यवसाय