शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: अविनाश धनवे खून प्रकरणातील फिर्यादीने पोलीस ठाण्यासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 22:50 IST

Pune Crime News: बहुचर्चित 'अविनाश धनवे खून प्रकरणा'तील फिर्यादी व अविनाशची पत्नी पुजा धनवे हिने, पोलीस यंत्रणा आरोपीना संरक्षण देत असल्याचा आरोप करत इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वतला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

-  शैलेश काटे इंदापूर  : बहुचर्चित 'अविनाश धनवे खून प्रकरणा'तील फिर्यादी व अविनाशची पत्नी पुजा धनवे हिने, पोलीस यंत्रणा आरोपीना संरक्षण देत असल्याचा आरोप करत इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वतला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुजा ही आपल्या काही नातलगांसमवेत इंदापूरला आली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तिने 'पोलीस योग्य प्रकारे तपास करीत नाहीत.. माझा पती हा कोयता गॅंगचा मोरक्या नव्हता.मात्र वर्तमानपत्रांनी तसे चित्र तयार केले आहे. अविनाशचे मारेकरी दिवसाढवळ्या उघड फिरत आहेत.आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत.पोलीस मात्र गप्प आहेत. ते आरोपींना संरक्षण देत आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणाच्या हातून मरण्यासाठ  आम्अही इथेच जीव देतो',अशा आशयाचे वक्तव्य करत सोबत आणलेल्या बाटलीतील ज्वालाग्राही पदार्थ अंगावर ओतून घेतला.उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

गेल्या शनिवारी (दि.१६) रात्री आठ वाजता येथील हॉटेल जगदंब मध्ये जेवणासाठी आलेल्या अविनाश धनवेचा गोळ्या घालून व कोयत्याने वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्यासह अकरा जणांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. चार जणांना अटक ही केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी