शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्य संचालक पद रिक्त; बदल्या, भरत्या, खरेदी प्रक्रियेची कामे रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:52 IST

१३ दिवसांपासून पद रिक्त...

पुणे :पुणे आणि मुंबई येथील दाेन्ही आराेग्य संचालकांची पदे रिक्त असून याला १३ दिवस झाले तरी अजुनही पदे भरलेले नाहीत. त्यामुळे, आराेग्य विभागातल्या विनंती बदल्या, नवीन भरती प्रक्रिया, लाखाेंची खरेदी आणि मंजुरी प्रकरणे रखडली आहेत. एकीकडे आराेग्यमंत्री खात्याचे पूर्ण स्ट्रक्चर बदलण्याची भाषा करतात आणि साधा संचालक नियुक्त का करत नाहीत, असा प्रश्न आता आराेग्य क्षेत्रातील जाणकारांकडून विचारला जात आहे.

आराेग्य संचालक हा आराेग्य खात्याचा प्रमुख असताे. मुंबई आणि पुणे असे दाेन आराेग्य संचालक पदे आहेत. कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या, विनंती बदल्या, नवीन भरती, औषधे किंवा इतर साहित्यांची खरेदी, कारवाया, नवीन कामांना मंजुरी आदी प्रकरणे राज्यभरातून रखडली आहेत. त्यामुळे आराेग्य सेवेचे स्थानिक, विभागीय कामकाज पूर्णपणे रखडले आहे. इतके दिवस संचालक पद रिक्त राहते याचा अर्थ आराेग्य खाते चालवायचे आहे की बंद करायचे आहे, असाही प्रश्न विचारला जात आहे.

माेठया निर्णयांच्या फाईल्स जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आराेग्य अधिकारी पुढे आराेग्य उपसंचालकांच्या आणि आराेग्य संचालकाच्या सहीने मंत्रालयाकडे जातात. तेथे आराेग्य आयुक्त, सचिव यांनी मंजुरी दिल्यानंतर ते काम मार्गी लागते. परंतु, संचालकच नसल्याने राज्यात सर्वच ठिकाणी सर्व प्रकारच्या कामांचा खाेळंबा झाला आहे. सर्व फाईलिंचा ढीग पडून आहे. त्यामुळे, काम कसे करायचे असा प्रश्न आराेग्य खात्यातील अधिका-यांना पडला आहे.

आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तीन ते चार दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्या खात्याने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजाेखा मांडला हाेता. त्यामध्ये त्यांनी खात्यामध्ये नवनवीन उपक्रम सूरू करण्याचे तसेच बिंदुनामावली तयार करण्यापासून परिमंडळांचा विस्तार ८ हून २० करण्याची घाेषणा केली आहे. साेबतच येत्या दाेन ते तीन दिवसांत आराेग्य संचालकांचे पद भरले जाईल, असेही स्पष्ट केले हाेते. आराेग्यमंत्री खात्याचा कायापालट करण्याच्या घाेषणा करतात मात्र, अजुनही एक संचालक नियुक्त केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड