शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही; नितीन गडकरींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:29 IST

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही

पुणे : आपला देश आता सुपर इकॉनॉमी बनण्याच्या मोडवर आहे. भारत आत्मनिर्भर होईल. आपण इकॉनॉमी पॉवर आत्मसात करू; पण देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होणार आहे. ती दूर झाली पाहिजे. यासाठी सामाजिक व सर्वसमावेशक विचार आवश्यक आहेत, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘नागपूरच्या मारवाडी फाउंडेशन’च्या वतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल’च्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उद्योजक विठ्ठल मणियार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अतुल पोटेचा, डी. आर. मल आणि सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते.

‘देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक मूल्याधिष्टित प्रगती आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे विचार भिन्नता नव्हे विचार शून्यता ही समस्या आहे. यासाठी सर्व विचारांचे पालन करणे हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. आज शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. यावर उद्याच्या भारताचे भवितव्य ठरणार आहे. सांप्रदायिकविरहित सामाजिक विचार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही. अशी प्रगल्भ संपन्नता एकात्म पद्धतीने पुढे जाईल तेव्हाच बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण होईल. भविष्यातला विद्यार्थी तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliticsराजकारणEducationशिक्षण