शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची चूक पडली महागात; भरावा लागला तब्बल ६० लाखांचा दंड   

By राजू हिंगे | Updated: February 2, 2025 15:39 IST

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ९ लाख १९ हजार २५८ रुपयांचा दंड वसूल केला

पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांना पुणे महापालिकेने कारवाईचा दणका दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करून जानेवारीत ७ हजार ५९३ नागरिकांकडून ६० लाख २९ हजार ९८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ९ लाख १९ हजार २५८ रुपयांचा दंड वसूल केला आहे.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, वर्गीकरण न करता ओला आणि सुका कचरा देणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, जैववैद्यकीय कचरा, प्राण्याद्वारे होणारी अस्वच्छता, कबुतरे आणि पारव्यांना उघड्यावर खाद्य टाकणे अशा विविध कारणांसाठी हा दंड वसूल केला आहे. यापूर्वी शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने शहारातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे दिली होती. मात्र, दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावीपणे ही कारवाई होत नव्हती. यामुळे महापालिकेने इंदूर महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर गस्ती पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी ३१ लाख ८२ हजार २१०, बांधकाम राडारोडा टाकल्याप्रकरणी ७ लाख ५ हजार ६५०, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाकडुन २ लाख २३ हजार रूपये दंड वसुल केला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणा०याकडुन १ लाख ७९ हजार १४० रूपयांचा दंड घेतला आहे.क्षेत्रीय कार्यालयाचे नाव आणि दंडाची रक्कमकोंढवा-येवलेवाडी -  ९ लाख १९ हजार २५८औंध-बाणेर - ६ लाख १८ हजार ७१४सिंहगड रस्ता - ५ लाख २२ हजार ६५०हडपसर  -  ५ लाख ०७ हजार ४५०नगर रस्ता-वडगाव शेरी - ४ लाख ४५ हजार ५००कोथरूड-बावधन - ४ लाख ०३ हजारवारजे-कर्वेनगर  - ३ लाख ९६ हजार ०५०धनकवडी-सहकारनगर - ३ लाख ४३ हजार ५८०घोले रोड-शिवाजीनगर - २ लाख ९३ हजार ७८०ढोले पाटील रस्ता -  २ लाख ३३ हजार २५४वानवडी रामटेकडी - २ लाख १८ हजार ५००भवानी पेठ - २ लाख १६ हजार ९४०कसबा-विश्रामबाग - २ लाख १३ हजार १५०येरवडा-कळस-धानोरी  - २ लाख १० हजार ८००बिबवेवाडी - १ लाख ४४ हजार ३५४

शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे . नागरिकांनी अस्वच्छता करू नये, यासाठी जनजागृतीही केली जाते. या पुढेही या कारवाईची तीव्रता आणखीन वाढविण्यात येणार आहे. - संदीप कदम, उपायुक्त , घनकचरा विभाग विभाग, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न