शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण...

By राजू इनामदार | Updated: February 26, 2025 17:03 IST

स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून राजकीय पक्ष आक्रमक; परिवहन राज्यमंत्री वगळता अनेकांची पाहणी 

पुणे: स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी पहाटे झालेल्या बलात्कार प्रकरणावरून स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानकात जाऊन तोडफोड केली व प्रशासन तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान अनेक राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाला भेट दिली तसेच पोलिसांनी याची कठोर चौकशी करून अटक आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.या परिसरात दोन वर्षे महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या स्थानकातील सर्व व्यवस्थाच बिघडली आहे. प्रामुख्याने स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र राजकीय पुढारी, पक्ष पदाधिकारी यांच्यापैकी कोणाचेच स्थानकाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही. प्रशासन त्यांना जमेल त्याप्रमाणे, सोयीने येथील कामकाज पहात असते. रात्रीच्या सुमारास तसेच पहाटेच्या वेळेसच स्थानकामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी बुधवारी दुपारी स्थानकाला भेट दिली. त्यांच्यासमवेत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे व अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावरून पोलिस आयुक्तांकडे चौकशी केली. संबधित पोलिस ठाण्यातही त्यांनी संपर्क साधला. वसंत मोरे सह अन्य अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी होते. 

संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याबाबत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर स्थानकात वावरताता महिला, मुलींनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, त्यांनी काहीही सांगितले तरी त्यांचे ऐकू नये, कोणतीही समस्या असेल तर स्थानक प्रमुख किंवा एसटीचे जे अधिकारी उपस्थित असतील त्यांच्याशीच थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. माजी नगरसेवक ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनीही बसस्थानकाला भेट दिली व कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक झाल्याचे म्हटले आहे. गुन्हेगारांना राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही, आधी काही गुन्हे दाखल असलेली व्यक्ती एखाद्या स्थानकात अशी मोकाट कशी फिरू शकते असा प्रश्न खासदार सुळे यांनी उपस्थित केला. आमदार पवार यांनी या घटनेचा निषेध करत निदान आता तरी सरकारने जागे व्हावे व अशा गोष्टींना आळा बसावा म्हणून काही धोरण तयार करावे अशी मागणी त्यांनी केली.परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ वगळता अनेक राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाला भेट दिली. मंत्री मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघातच हे स्थानक येते. त्या दौऱ्यावर परगावी गेल्या असल्याचे समजले. मोबाईलवरूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. समाजमाध्यमांवरही त्यांच्याकडून या घटनेबद्दल काही प्रसारित करण्यात आलेले नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwargateस्वारगेटBus DriverबसचालकShivshahiशिवशाहीswargate bus depotस्वारगेट बसस्थानक