शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण महिला तब्बल १० वर्षांनंतर सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:02 IST

मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेलेली पासष्ट वर्षीय महिला तब्बल दहा वर्षांनी पुन्हा आपल्या घरी हेल्पींग हँन्ड सोशल फौंडेशनच्या मदतीने सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली.

धनकवडी : मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेलेली पासष्ट वर्षीय महिला तब्बल दहा वर्षांनी पुन्हा आपल्या घरी हेल्पींग हँन्ड सोशल फौंडेशनच्या मदतीने सुखरूपच नव्हे, तर बरी होऊन परतली. गेली दहा वर्षे बेपत्ता आई परतल्याचा आनंद तिचा मुलगा जगदीश दरेकर, पती गोविंद दरेकर, नातू व सूनेच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जुन्नर तालुक्यातील आर्वी या खेड्यातील सुमन गोविंद दरेकर (६५) या महिलेची ही कहाणी आहे.

सुमन मनोरुग्ण असल्याने तिच्या वर उपचार केले गेले; मात्र कोण तीच सुधारणा झाली नाही. अशा च अवस्थेत त्या कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. दरेकर कुटुंबीयांनी विशेषत: तिच्या मुलाने तिचा नातेवाईकां सह विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र पदरी निराशाच पडली. मनोरुग्ण अवस्थेतच भटकत-भटकत त्या पुण्यात कश्या पोहोचल्या ? याची पूर्ण माहिती सुद्धा कोणाला मिळाली नाही.

दरम्यान सात महिन्यांपूर्वी खडक पोलीस स्टेशन हद्दीत एक मनो रुग्ण महिला हलाखीच्या अवस्थे त पावसात भिजत असल्याची माहिती हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशनच्या स्वाती डिंबळे यांना मिळाली. डिंबळे यांनी तात्काळ त्या महिलेला ऐरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिची स्मृती जागृत झाली. या काळात डिंबळे यांनी आपुलकीने महिलेशी बोलायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्या बोलू लागल्या आणि आपले नाव सुमन असल्याचे सांगितले. तसेच मुलाचे नाव व गाव मंचर असल्याचे सुद्धा सांगितले.  

दरम्यान उपचारनंतर सुमन बरी झाल्यानंतर स्वाती डिंबळे यांनी सेवाभावी कार्यकर्ते उमेश सोनवणे व आश्रमातील सह कार्यांच्या मदतीने तिला मंचर गावी आणले परंतु मंचर मध्ये आल्या नंतर तिचा मुलगा, पती व परिवारातील कोणीही तेथे राहत नसल्याचे दिसून आले. दरम्यान येथून ते जुन्नर येथील आर्वी गावात राहत असल्याची माहिती मिळाली. दिवसभर उन्हातानात सुमनच्या घरचा शोध घेत अखेर सांयकाळी तिचं घर सापडले. सुमन आश्रमात सात महिने राहिली परंतु घरी पोहोचल्या नंतर ती तब्बल दहा वर्षापासून मनोरुग्ण अवस्थेत घर सोडून गेली असल्याची माहिती मिळाली. 

''तब्बल दहा वर्षांनंतर सुमन कुटुंबात परतल्या तिला तिचा परिवार मिळाला आणि सात महिन्यांपासूनचा आमचा शोध थांबला. मनोरुग्ण लोकांना मनोरुग्ण अवस्थेत फक्त घरात ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केल्यास ते बरे होऊ शकतात. मनोरुग्ण व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्यांची वेळीच सहानुभूती पूर्वक दखल घेणे आवश्यक आहे असे स्वाती डिंबळे (संचालिका, हेल्पिंग हॅन्ड सोशल फाऊंडेशन, संचलित आसरा अनाथांचा हक्काचा निवारा यांनी सांगितले.''  

 

टॅग्स :Dhankawadiधनकवडीsocial workerसमाजसेवकPoliceपोलिसdocterडॉक्टर