शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांसाठी धावून येणारा अन् आमच्या हक्काचा माणूस जिंकला; कसब्यातील नागरिकांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:43 IST

प्रभागात वीस ते पंचवीस वर्षे हे नगरसेवक राहिल्यामुळे रवीभाऊंना सर्वसामान्य गरिबांची जाण

पुणे: कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली. गृहमंत्री अमित शहा,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल 30 वर्षांनी भाजपने पारंपारिक मतदारसंघ गमावला आहे. संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव झाला. गोरगरिबांचा आणि आमच्या हक्काचा माणूस निवडून आल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.  

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर कसबा मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या मदतीला धावणारा, सुख दुःखात सहभागी होणारा,फेरीवाले, हातगाडीवाले ,दवाखान्यात बिल संदर्भात मदत, अतिक्रमण असो अन्य सरकारी कागदपत्रे असो अशा सर्व कामांसाठी धंगेकर धावून येतात. स्वत मदत करणारा आमचा गोरगरिबांचा हक्काचा माणूस निवडून आल्याने नागरिकांनी आनंद उत्सव साजरा करत आहेत. 

''कॉस्मेटिक लेडीज सौंदर्यचा स्टॉल शर्मिली चौकात आहे. दुकान उभरण्यापासून  मदत केली. केव्हाही कसले काम असेल तर मदतीला धावून येतात. - कल्पना शिंदे- कसबा पेठ''

''तांबट चौकात केटरर्स व्यवसाय आहे. रविभाऊ स्वतः पुढाकार घेऊन नेहमी मदतीला धाऊन येतात. रवि भाऊ विजयी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हा सर्व कुटुंबाला आनंद होत आहे. हा सत्याचा विजय आहे. - वनिता जगताप, तांबट चौक रास्ता पेठ'' ''सोमवार पेठ या ठिकाणी केक शॉप दुकान आहे. धन शक्ती विरोधी जनशक्तीचा विजय आहे. गाडीवाले, फेरीवाले सामान्यांचा रविभाऊ असल्याने लहानापासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांना मदत करीत आले आहेत. यामुळे यांचा विजयाने आम्हा सर्व परिसरातील लोकांना आनंद होत आहे. - मनीषा सरोदे, सोमावर पेठ केक शॉप दुकान''

''प्रभागात वीस ते पंचवीस वर्षे हे नगरसेवक राहिल्यामुळे रवीभाऊंना सर्वसामान्य गरिबांची जाण आहे. यामुळे यांना सर्व नागरिकांनी एकमताने निवडून दिले. रविभाऊ आमच्या हक्काचा आहे त्यामुळे या विजयाने सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत आहे. सत्याच्या लढाईत आम्ही विजय झालो. - मीना पवार, रास्ता पेठ''

''रात्र दिवस प्रचार करुन जनतेपर्यंत पोहोचून काम केलं या कष्टाचे चीज झाले आहे. सर्व जाती धर्मासाठी काम केल्यामुळे हा सत्याचा विजय मानला जात आहे.  खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत असल्याचे  कसबा मतदारसंघांमध्ये जनतेने दाखवून दिले. - सचिन बगाडे, काची आळी''

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी