शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष; सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक

By नम्रता फडणीस | Updated: July 2, 2024 17:53 IST

सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख पाठवायला सांगितले

पुणे : टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा फंडा सुरूच आहे. शहरात दोघांची १६ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

५० वर्षाच्या व्यक्तीची ४ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक सायबर चोरट्याने ५० वर्षाच्या व्यक्तीला व्हॉटस अप क्रमांक पाठवून ऑनलाईन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे कमविण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानुसार त्यांच्याकडून विविध बँक खात्यावर ४ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जानेवारी ते १० जानेवारीच्या दरम्यान घडली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बागवे करत आहेत.

महिलेची १२ लाखांची फसवणूक टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने विमाननगर येथील महिलेची १२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना ४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादीमहिलेशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख पाठवायला लावून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसWomenमहिलाMONEYपैसा