शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video: "राजीनाम्याचा विषय संपला आता कामाला सुरुवात", शरद पवारांचे बारामतीत जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 16:04 IST

देशका नेता कै सा हो,पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी परिसर दुमदुमला

बारामती : गेल्या काही दिवसांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भातील घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामतीत आगमन झाले. यावेळी माळेगांव येथील गोविंदबाग निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जंगी स्वागत केले. यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने शहरात पक्ष पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी(दि ५) निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर बारामतीकर सुखावले.

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करुन,पेढे वाटुन आनंद व्यक्त केला. निर्णय मागे घेतल्याच्या दुसºयाच दिवशी पवार बारामतीत परतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जोरदार स्वागत केले.पवार येणार असल्याची माहिती सर्वांना सकाळीच समजली होती. त्यामुळे सकाळपासुनच गोविंदबागेच्या प्रवेशद्वारावर सर्वांनी गर्दी केली होती. पवार यांचे आगमन होताच सर्वांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. देशका नेता कै सा हो,पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी परीसर दणाणला. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,उद्योजक रविआबा काळे यांनी शाल आणि  खास पवार यांच्यासाठी बनविलेला गुलाबांचा पुष्पहार घालुन जोरदार स्वागत केले.माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

दरम्यान, गोविंदबागेतून बाहेर पडताना पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना पाहुन त्यांचा ताफा थांबवला. यावेळी त्यांनी माध्यमाबरोबर मोजुन १३ सेकंद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संवाद साधला. पत्रकारांशी राजीनाम्याच्या विषयावर पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर राजीनाम्याचा विषय संपला. आता कामाला सुरवात करु, असे सांगत त्यांनी एका वाक्यात विषय संपविला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस