शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
2
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
3
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
4
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
5
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
6
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
7
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम
8
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण
9
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश
10
इतर राज्यांमध्येही चालली छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांची जादू
11
Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश
12
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा
13
बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण 
14
Lok Sabha Election Result 2024 : भाजपसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ठरले ‘लकी’
15
‘एमएमआर’मध्ये उपलब्ध अकरावीच्या चार लाख जागा, यंदा २५ हजार जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ 
16
महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला
17
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी
18
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
19
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
20
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं

विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:07 AM

मतदारांचा एकच प्रश्न, विकासकामांचे काय करणार ते बोला 

- दुर्गेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तीन टर्म खासदार राहिलेल्या  शिवाजीराव आढळराव पाटील यांना २०१९ मध्ये पराभूत करून डॉ. अमोल कोल्हे जवळपास ५८ हजार मतांनी विजयी झाले होते. तेव्हाची आणि आजची राजकीय गणिते पूर्णपणे बदलेली आहेत. कोल्हे यांच्या पाठीमागे एकसंघपणे असलेली राष्ट्रवादीची ताकद यंदा विभागली गेली असून काँग्रेस आणि उद्धवसेनेचे त्यांना बळ मिळत आहे. तर भाजप, अजित पवार गट आणि शिंदेसेना एकत्र आल्यामुळे शिरुर मतदार संघात अटीतटीची लढाई होणार आहे. 

 या रणधुमाळीत दोघांनीही पहिल्या दिवसापासून एकमेकांना टार्गेट केले आहे. ही निवडणूक विकासात्मक मुद्द्यांवर कमी आणि एकमेकांची उणीधुणी काढण्यात जात आहे. स्थानिक राजकीय समीकरणे जरी बेरजेचे असली तरी अंतर्गत कलह या मतदारसंघात बघायला मिळू शकतो, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. 

या मतदारसंघातील  भोसरी, चाकण, तळेगाव, शिक्रापूर आणि रांजणगाव भागातील औद्योगिक वसाहतींचे प्रश्न या निवडणुकीत निर्णायक ठरणार, असे चित्र दिसत आहे.

सामाजिक समीकरणाची रणनीतीn शिरूरची निवडणूक अटीतटीची होऊ लागली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असून, डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अपेक्षित अशी उत्तरे दिली आहेत. n जातीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासही सुरुवात झाली आहे. कोल्हे यांना माळी समाजाने पाठिंबा दिला आहे. एकही मत चुकता कामा नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. 

आढळराव पाटील यांचे आव्हानn महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यांवर डॉ. अमोल कोल्हे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. n मात्र, त्याला त्यांनी सडतोड उत्तरे दिली आहेत. दरम्यान संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून डॉ. कोल्हे यांनी आढळरावांना घेरले. त्यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडून एकमेकांची उणीदुणी काढण्यात दोन्ही उमेदवार व्यस्त असल्याचे चित्र आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देचाकण, नगर रोडवरील वाहतूक काेंडीमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये एकही नवीन उद्योग न आल्याने रोजगार निर्मिती नाही  पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची संकल्पना आणली. प्रकल्पाला गती मिळाली. जुन्नरच्या जीएमआरटीमुळे रेल्वे प्रकल्पाचे घोडे अडले. यातून मार्ग काढण्यासाठी कोणीही पुढे येईना. 

कोरोना काळात शिरुर मतदारसंघात मध्यवर्ती ठिकाणी मोठे रुग्णालयाची आवश्यकता भासली. त्यातूनच इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाचा जन्म झाला. परंतु, हा प्रकल्प नक्की काय आहे. तो कुठे होणार याबाबत अजूनपर्यंत लोकांना स्पष्ट माहिती नाही आहे.  

टॅग्स :shirur-pcशिरूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४