शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:41 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले

पुणे - शहरात बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. "शहरातील कोणताही फेरीवाला किंवा मजूर संशयास्पद वाटल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देणे नागरिकांचे कर्तव्य आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात लोकसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे विविध समस्या उभ्या राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.पुणे पोलिसांच्या पश्चिम विभागात विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल ३.८४ कोटी रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी बांगलादेशी घुसखोरांविषयी भाष्य करत, त्यांच्या समस्यांवर केंद्र व राज्य सरकार ठोस पावले उचलत असल्याचे सांगितले."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना ओळखून त्यांच्या मायदेशी परत पाठवणे आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत," अशी माहिती पाटील यांनी दिली. पुणे व मुंबई या शहरांतील बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले.तक्रारदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ऐवज न्यायालयीन आदेशानुसार तक्रारदारांना परत करण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याचे निर्देश दिले. "तक्रारदारांना मालकत्वाचा पुरावा सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांचा ऐवज परत करण्यात यावा," असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBangladeshबांगलादेशpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड