शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:30 IST

मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही

बारामती : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सार्वजनिक रुग्णालयात हि घटना घडलेली घटना चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्यात अशी घटना घडली असेल. तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, याचा हा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळाला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी ठाणे येथील घटनेबाबत चिंता व्यक्त करीत शासनावर टीका केली. पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. भाजपचा सत्तेचा गैरवापर करुन हि पावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या, त्यानंतर ते भाजपमध्ये जाऊन बसले. तोच प्रयत्न करण्याची भुमिका जयंत पाटील यांच्याबाबत दिसुन येत आहे. मात्र,जयंत पाटील विचारांच्याबाबत स्पष्ट आहेत, याची मला खात्री असल्याचे पवार म्हणाले.   मणिपुरकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. संसदेत आम्ही याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. मणिपुरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी सक्तीची भुमिका घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या दोन अडीच तासांच्या भाषणात या भुमिकेचा अभाव होता. मणिपुरमधील सध्याच्या अवस्थेला काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही. ९ वर्षांपासुन भाजपकडे तेथील सत्ता आहे. समजा काँग्रेसने काम चांगले केले नसल्याने तेथील लोकांनी भाजपला संधी दिली. नऊ वर्षापासुन भाजपची तेथे सत्ता आहे. नऊ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले, अशी  टिका पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण