शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पती दारू पिऊन सतत त्रास द्यायचा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून, मृतदेह फेकला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 17:35 IST

मृतदेह विहिरीत फेकून पत्नीने पोलिसांकडे पती हरवल्याची तक्रार दिली होती

यवत : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून पुरावे नष्ट करत मृतदेह विहिरीत टाकल्याचे यवत पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

ही घटना भांडगाव (ता. दौंड) येथील मलभारे वस्तीनजीक घडली आहे. सुनील पांडुरंग जगताप (वय ४२, रा. भांडगाव, ता. दौंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी पत्नी शीतल जगताप व तिचा प्रियकर अतुल चौघुले यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. शीतल हिचा पती सुनील तिला दारू पिऊन सतत त्रास देत असे. याच त्रासाला कंटाळून दोघांनी सोमवार (दि.१५) रोजी पहाटे ५ वाजता सुनील जगताप घरासमोर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालून विहिरीत टाकून त्याचा खून केला. तसेच रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळून पुरावा नष्ट केला. खून केल्यानंतर पत्नी शीतल हिने पोलिसांकडे पती हरवला असल्याची तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने यवत पोलिसांनी शेजारी राहणारे व इतर साक्षीदारांकडे चौकशी केली असता शीतल जगताप व अतुल चौघुले यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना समजले.

काल (दि. १८) रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास सुनील जगताप याचा मृतदेह जवळ असलेल्या विहिरीच्या पाण्यावर तरंगताना मिळून आला. सदर मृतदेह बाहेर काढला असता डोक्यावर जखम असल्याचे आढळून आल्यानंतर सदर खूनच असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी पत्नी शीतल जगताप व अतुल चौघुले यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची काबुली दिली. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdaund-acदौंड