शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोटींच्या गृहप्रकल्पांच्या मंजुरीचा तिढा सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:51 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय : नऊ महिन्यांनी प्रश्न मार्गी; पर्यावरण मंजुरी देण्यासाठी राज्य समितीस दोन महिन्यांची मुदत

पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील हजारो कोटी रुपयांच्या गृहप्रकल्पांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा अखेर नऊ महिन्यांनी सुटला आहे. या प्रकल्पांना राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीने मंजुरी द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी आठ आठवड्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. हा परिसर जास्त प्रदूषित असल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत जानेवारी महिन्यात अधिसूचना काढली.त्यानुसार राज्यपातळीवरील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून मोठ्या प्रकल्पांना पूर्वीप्रमाणे मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली होती. याप्रकरणी ‘क्रेडाई’, पुणेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

घरांच्या किमतींवर परिणामपुण्याचा विचार करता शंभराहून अधिक प्रकल्पांना याचा फटका बसला. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे. यात २० हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या मोठ्या गृहप्रकल्पांचा समावेश होता. हे प्रकल्प सहा महिन्यांहून अधिक काळ रखडल्याने विकासकांना फटका बसला. याचबरोबर हे प्रकल्प रखडल्याने गेल्यावर्षी घरांचा पुरवठा कमी झाला. सरकारला विकासकांकडून आणि घरांच्या विक्रीतून मिळणारा महसूलही कमी झाला. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम ग्राहक ते विकासक या साखळीतील सर्व घटकांबरोबरच घरांच्या किमतींवरही झाला.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आजूबाजूचा पाच किलोमीटर परिसर सर्वाधिक प्रदूषित नसतानाही राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीने येथील गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यास नकार दिला होता. याविरोधात ‘क्रेडाई’ने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने ‘क्रेडाई’च्या बाजूने निकाल दिला असून, समितीला आठ आठवड्यांत प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. – मनीष कनेरिया, पर्यावरण समिती, ‘क्रेडाई’, पुणे.पिंपरी-चिंचवडच्या परिसरातील सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक २०२४ मध्ये ३२.५२ होता. सर्वाधिक प्रदूषित वर्गवारीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे शहर सर्वाधिक प्रदूषित भागाच्या निकषात बसत नाही. येथील प्रकल्पांना पूर्वीप्रमाणे राज्याच्या समितीकडून मंजुरी मिळावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी न्यायालयाकडे केली. यावर उच्च न्यायालयाने, ‘पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांना सध्याच्या सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाच्या आधारे आणि नियमानुसार राज्याच्या समितीने परवानगी द्यावी,’ असे निर्देश दिले. यासाठी आठ आठवड्यांची मुदत उच्च न्यायालयाने दिली आहे.- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रHomeसुंदर गृहनियोजन