शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांची घरे लाटली! अमनोरा पार्कप्रकरणी चौकशी करा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:42 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली गंभीर दखल; चौकशी अहवालाच्या आधारे तातडीने कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हडपसर, पुणे येथील सिटी कॉर्पोरेशनच्या अमनोरा पार्क टाउन या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के घरे ही म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांना दिले आहेत.

म्हाडा उपाध्यक्षांनी याबाबतचा सविस्तर तपशील मागवून चौकशी करावी. चौकशी अहवालाच्या आधारे तातडीने कारवाई करावी, असे फडणवीस यांनी बजावले आहे. त्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

कोणालाही पाठीशी घालणार नाही; कारवाई होणार : गृहनिर्माणमंत्री सावेअमनोरा पार्क टाउन या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के घरे ही म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डरवर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सावे म्हणाले की, चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिकच्या जागेवर उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के सदनिका या गरिबांसाठी अल्प दरात घरे उपलब्ध करून देण्यास राखीव ठेवाव्या, असा निर्णय सरकारने २०१३ मध्येच घेतला. त्यानुसार अमनोरा प्रकल्पातील २० टक्के घरे म्हाडाला द्यायला हवी होती. ती त्यांनी तातडीने द्यावीत, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल.

सावे म्हणाले की, मध्यंतरी मी म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी पुणे येथे गेलो असता संबंधित अधिकाऱ्यांना गृहनिर्माण प्रकल्पांमधील राखीव घरे म्हाडाकडे हस्तांतरित न केलेल्यांची यादी तयार करण्यास सांगितले होते. महापालिकांच्या शहरांत गरिबांना १ लाख परवडणारी घरे देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. 

मुख्यत्वे ही २० टक्के राखीव घरे म्हाडाला हस्तांतरित होतील हे गृहीत धरूनच हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जे बिल्डर आडमुठेपणा करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाईल. मी आजच या संदर्भात म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

टॅग्स :mhadaम्हाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस