शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

FTII च्या उपोषणास बसलेल्या एका विद्यार्थ्याची तब्बेत ढासळली; रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला

By नम्रता फडणीस | Updated: May 19, 2023 17:13 IST

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसागणिक ढासळत असून एकाला तर तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता

पुणे : एफटीआयआय च्या 2020 च्या बँचमधील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी एकाची आरोग्य स्थिती ढासळली असून, डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. तरीही प्रशासन ढिम्मचं आहे. विद्यार्थी उपोषणास बसून पाच दिवस उलटले तरी अद्याप प्रशासनातील एकही व्यक्ती उपोषण स्थळी फिरकलेली नसल्याचे स्टुडंट असोसिएशनचे म्हणणे आहे.

एफटीआयआयमधील 2020 बँचच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित क्रेडिट नसणे या कारणास्तव संस्थेने पाच विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्या वर्षातील विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले असून, गेल्या पाच दिवसांपासून काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. विद्यार्थ्याला 2020 च्या शैक्षणिक वर्षात समाविष्ट करुन घ्यावे, प्रशासनाने प्रॉक्टर नोटीस मागे घ्यावी आणि उपोषण स्थगित झाल्यानंतर तातडीने नोटीस दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरु करावा तसेच इन्स्टिट्यूटमध्ये एस/एसटी सेल व मानसिक आरोग्य सेल  स्थापन करावा अशा मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

एफटीआयआय प्रशासनाने येत्या 30 मे ला शैक्षणिक परिषदेची बैठक आयोजित केली आहे. मात्र त्याला खूप कालावधी बाकी आहे. त्यांचे आरोग्य बघता हा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती दाखवावी आणि त्यांची भेट घ्यावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसागणिक ढासळत आहे. एका विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. 2020 च्या बँचमधील अजून दोन विद्यार्थी शुक्रवारपासून उपोषणाला बसले असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थीagitationआंदोलनEducationशिक्षणartकला