शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Supriya Sule: सरकारला जरांगे पाटलांच्या तब्येतीची चिंता नाही, याला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:28 IST

मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाची आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने पूर्णपणे फसवणूक केली

पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. उपोषणादरम्यान अन्न पाण्याचा त्याग केल्याने जरांगे पाटील यांची तब्बेत खालावली आहे. त्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटलांवर सातत्याने उपोषण करण्याची का वेळ आली. त्यांच्या तब्येतीची चिंता नाही यांना, याला जबाबदार कोण, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडवणीस गृहमंत्री होतात, तेव्हा क्राइम रेट वाढतो. ड्रग्स,हिट अॅण्ड रनच्या केसेस, महिलांवरील अत्याचार वाढले. सरकारवर मायबाप जनतेचा कसा विश्वास राहणार, असे सुळे म्हणाल्या. पुर्णपणे मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाची आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने फसवणूक केली. बारामतीत १० वर्षांपुर्वी आंदोलन झाले होते. त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याबाबत शब्द दिला होता. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. त्यानंतर देखील याबाबत निर्णय झालेला नाही. जरांगे पाटलांवर सातत्याने उपोषण करण्याची का वेळ आली. त्यांच्या तब्येतीची चिंता नाही यांना, याला जबाबदार कोण, असा सवाल सुळे यांनी केला. आरक्षण प्रश्नावर निर्माण झालेल्या तणावाला राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

या सरकारने पक्ष फोडले , घर फोडल, इन्कम टॅक्स सीबीआय इडीच्या नोटीसा पाठविल्या एवढंच केले. कोणतेही ठोस कामे केली नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे प्रत्येक ‘कॅबिनेट‘ला पंधरा दिवसाला नविन निर्णय घेण्यासारखा ‘गतिमान‘ सरकारला उत्साह कसा आला, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला आहे. 

सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील

महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का, याबाबत स्पष्टता करावी. त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकलं होत, त्याचे हात बांधले होते, मग तो बंदुकी पर्यंत पोहोचला कसा, पोलिसांना गोळी लागली कशी, एन्काऊंटर झाला कसा हाच मोठा प्रश्न मला पडला आहे. सरकारने हा खटला फास्टट्रॅकद्वारे चालवून जाहिररीत्या आरोपीला फाशी देण्याची ‘कमिटमेंट’ सरकारने केली होती. या प्रकरणी ‘एफ आय आर’ ला किती आणि का वेळ लागला,याची सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील, यापासून सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस