शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:39 IST

विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

जेजुरी : कुलदैवत खंडेरायाच्या नगरीतील जुनी जेजुरी येथील सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा आराखडा सदोष आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आराखडा बदलण्यात यावा व स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी बिग्रेडचे अध्यक्ष तथा देवसंस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप व जुनी जेजुरी येथील नागरिकांनी दिला असून, याबाबत खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे.आळंदी - पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ या रस्त्याचे रुंदीकरण सध्या द्रुतगतीने सुरू असून, सध्या झालेल्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याची गरज आहे, या मार्गावर रोजच अपघात होत असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातूनही या मार्गावर रुंदीकरण झाले मात्र अतिक्रमणे तितक्याच प्रमाणात वाढली आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे जुनी जेजुरी येथील उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम सदोष आहे तेथील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत येथील आराखडा दुरुस्त होऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.बुधवारी (दि. २२) खा. सुप्रिया सुळे या जेजुरीत देवदर्शनासाठी आलेल्या असताना येथील माजी नगरसेवक सत्यवान उबाळे, संपत कोळेकर, सुरेश उबाळे, रोहिदास जगताप, महेश उबाळे, अजय जगताप यांनी भेट घेत निवेदनाद्वारे आपल्या समस्या मांडल्या.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाJejuriजेजुरी