शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
4
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
5
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
6
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
7
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
8
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
9
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
10
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
11
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
12
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
13
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
14
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
15
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
16
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
17
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
18
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
19
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
20
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे

जिल्ह्याचा पुढील पाच वर्षांचा शेतीचा आराखडा होणार;कृषी विभाग १५ दिवसांत करणार आराखडा

By नितीन चौधरी | Updated: March 6, 2025 19:45 IST

पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे.

पुणे  कृषिक्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात आगामी पाच वर्षांत उत्पादनवाढीसह निर्यातीवरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वंकष आराखडा येत्या पंधरा दिवसांत तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करताना शेतकरी, संशोधन संस्था तसेच कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते अंतर्भूत केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात फुलशेतीसह फळबागांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे. केवळ निर्यातच नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठही पुण्यातून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाहतूक केली जाते. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी धोरणात काही बदल करणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी, बिगरसरकारी संस्थांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांची एकत्रित बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, प्रगतिशील शेतकरी सोपान कांचन, समीर डोळे, जितेंद्र बिडवई, सुनील भगत, भरत शिंदे, मुकुंद ठाकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, सुनील जाधव, तुळशीराम चौधरी उपस्थित होते.डुडी म्हणाले, जिल्ह्यात व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यातून फुले तसेच फळांचीदेखील निर्यात होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत नेमके काय हवे आहे. याचा अभ्यास करून त्यानुसार जिल्ह्यात लागवड होणे गरजेचे आहे. शेतकरी व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा पुढील पाच वर्षांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. यासाठी कृषी विभागाला आराखडा तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.यावेळी डुडी यांनी जिल्ह्यात निर्यातीसह सेंद्रिय शेती यावरही भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या कोल्ड चेनची पायाभूत सुविधा निर्माण करावी, अशी मागणी केली. काही शेतकऱ्यांनी निर्यात तसेच आयातीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही केली.

जिल्ह्याचा शेतीक्षेत्राचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बैठकीत आलेल्या सूचनांचा तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आराखडा तयार करण्यात येईल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना