शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:49 IST

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता

पुणे : पाच वर्षांपूर्वी पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सासू व सुनेमध्ये वादविवाद सुरू झाले. या वादाला कंटाळून ती विधवा सून माहेरी परतली आणि मुले पतीच्या आईकडे म्हणजे आजीकडेच राहिली. मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु मुलांनी ’आई’ नको ’आजी’ हवी असे सांगितल्याने  मुलांच्या कल्याणाच्या दृष्टीने व त्यांच्या योग्य व निकोप वाढीसाठी त्यांना आजीकडे ठेवणे योग्य होईल असा निर्वाळा कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिला.          मात्र, आईला भेटणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे म्हणून पंधरा दिवसातून एकदा कौटुंबिक न्यायालयाच्या बाल संकुलामध्ये दोन तासासाठी आईला मुलांना भेटता येणार आहे. तसेच उन्हाळी, हिवाळी व दिवाळीच्या सुट्टीमध्ये आईला मुले आपल्या घरी नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.         पती आणि पत्नीचा सुखी संसार सुरू असताना पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाला. त्यामुळे सासू व सूने मध्ये दुरावा निर्माण झाला. दोघांना तीन अज्ञान मुले आहेत. त्यांच्या ताब्याविषयी चा वाद कौटुंबिक न्यायालयात दाखल झाला. सुनेचे म्हणणे होते की ती छोटा व्यवसाय करून पैसा कमावते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सासुच्या म्हणण्यानुसार, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी करते. तिने आजपर्यंत मुलांच्या शिक्षणाचा पालनपोषण व औषध उपचाराचा खर्च केलेला आहे.

न्यायालयाने 15 वर्षीय मुलीची साक्ष नोंदविली. त्यामध्ये तिने आजीकडेच राहाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच इतर दोन मुलांशी समुपदेशकाने संवाद साधला.  त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या आजीकडे रहायचे आहे. न्यायालयाने मुलांच्या इच्छेचा विचार केला. तसेच आजीने मागील पाच वषार्पासून त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती तसेच आजीने त्यांच्या शिक्षणाची ही योग्य काळजी घेतली होती. मुलांच्या भविष्याचा व कल्याणाचा विचार करून न्यायालयाने मुलांचा ताबा आजीकडे ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्नadvocateवकिलSocialसामाजिक