शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसमोर वर्चस्व टिकवण्याचे आव्हान तर आघाडीसमोर मिळवण्याचे; पुणेकर कोणाला संधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:09 IST

कोथरूड, पर्वती मतदारसंघात बंडखोरीची चिन्हे, तसेच ६ पक्ष विभागल्यामुळे मतदारही गोंधळात

पुणे : काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या पुणे शहरावर भारतीय जनता पक्षाने सन २०१४ मध्ये पूर्ण वर्चस्व मिळवले. शहर लोकसभा मतदारसंघातील ६ व उपनगरांमधील २ अशा आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व मिळवले. सन २०१९ मध्ये त्यांचे २ मतदारसंघ गेले व वर्चस्वाला थोडा धक्का लागला. आता सन २०२४ मध्ये आहे ते वर्चस्व टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, तर अन्य पक्षांना ते मिळवण्याचे. त्यातही महायुती विरूद्ध महाविकास आघाडीतच प्रमुख ६ पक्ष विभागल्यामुळे मतदारही गोंधळात पडल्यासारखा झालेला दिसतो आहे.

पुणे शहरात ६ मतदारसंघ

कसबा, कोथरूड, पर्वती, कॅन्टोन्मेट, शिवाजीनगर, वडगाव शेरी हे ६ मतदारसंघ पुणे शहर लोकसभा मतदारसंघात येतात. हडपसर व खडकवासला हे दोन विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे मावळ व बारामती लोकसभा मतदारसंघात येतात, मात्र त्यांचा काही भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे ते शहरातच जमेस धरले जातात. या सर्व म्हणजे ८ मतदारसंघांवर सन २०१४ मध्ये भाजपने विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिका व नंतर शहर लोकसभा मतदारसंघांतही त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे एकत्र होते.

सन २०१९ ची स्थिती

सन २०१९ ची विधानसभा निवडणूकही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र असतानाच झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हडपसर व वडगाव शेरी हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणले. तरीही अन्य मतदारसंघांमध्ये विजय मिळवल्याने भाजपचे पुणे शहरावरील वर्चस्व कायम राहिले. मात्र सन २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघही त्यांच्या हातातून काँग्रेसकडे गेला. त्यामुळे आता शहरातील ६ पैकी ३ मतदारसंघात दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व कसब्यात काँग्रेस अशी विभागणी आहे.

सन २०२४ चे आव्हान

आता सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे वडगाव शेरी व हडपसर मधील दोन्ही आमदार फुटीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे गेले. हा पक्ष भाजपबरोबर महायुतीत आहे. त्यामुळे एका अर्थाने पुन्हा भाजपने ८ ही मतदारसंघांवर वर्चस्व मिळवले आहे. मात्र तरीही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

भाजपला भाजपचेच आव्हान

याशिवाय भाजपला भाजपमधूनच उभ्या राहिलेल्या आव्हानाचाही सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. कोथरूड या त्यांच्या बालेकिल्ल्यातच बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. त्याशिवाय पर्वती या सलग ३ वेळा ताब्यात असलेल्या मतदारसंघातही बंडखोरी होईल, असे दिसते आहे. सन २०१९ मध्ये शिवाजीनगर, कॅन्टोन्मेट व खडकवासला या जागा जाताजाता राहिल्या, त्यामुळे यंदा तेथील उमेदवारीबाबतही भाजप श्रेष्ठी विचार करत असल्याची चर्चा शहरात आहे. उमेदवार बदलाने फार फरक पडणार नाही, असाही मतप्रवाह चर्चेत आहेत.

गोंधळाची स्थिती

महायुतीत आता भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन प्रमुख व त्याशिवाय आरपीआय (आठवले गट) व अन्य काही पक्ष आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. त्याशिवाय यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी हेही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात असतील असे चित्र आहे. महायुती, महाआघाडीचे जागा वाटप अजून निश्चित झालेले नाही. या सर्व स्थितीमुळे मतदारही गोंधळात पडलेला दिसतो आहे.

टॅग्स :PuneपुणेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण