शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

तो मोका ८ सप्टेंबर २०२१ रोजी लावण्यात आला होता, तपास अधिकाऱ्यांचा दावा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 00:11 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह देऊन त्यात ज्या गुन्ह्याबाबत आरोप केले. तो मोक्का पुण्यात गिरीश महाजन यांच्याशी संबंधित ९ जणांवर लावण्यात आला होता.देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी थेट मुंबई गाठून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.

पुणे : ‘मविप्र’ संस्था काबीज करण्याच्या उद्दिष्टाने संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी ॲड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली, अशी फिर्याद ॲड. विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला होता. हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथक प्रमुख पोलीस उपायुक्त यांनी ३० ऑगस्ट २०२१ रोजी ९ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पडताळणी केली. त्यात तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या ९ जणांनी आपले संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असून तिचे मार्फतीने अवैध मार्गांनी अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी खंडणी, नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, जुलुम जबरदस्तीने शैक्षणिक संस्था बळकाविण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवली आहेत. मागील १० वर्षाचे कालावधीमध्ये या ९ जणांवर ३ किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेले गुन्हे दाखल असून त्यांच्यावर एका पेक्षा जास्त दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन ८ सप्टेंबर २०२१ रोजी या ९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे साेपविण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने ९ जानेवारी २०२२ रोजी पुणे व जळगाव येथे नीलेश भोईटेसह ५ जणांच्या घरी छापे घालून झडती घेतली. मविप्र संस्थेशी संबंधित कागदपत्रे व गुन्ह्याशी संबंधित साधने जप्त करण्यात आली होती.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह देऊन त्यात ज्या गुन्ह्याबाबत आरोप केले. तो मोक्का पुण्यात गिरीश महाजन यांच्याशी संबंधित ९ जणांवर लावण्यात आला होता.देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी थेट मुंबई गाठून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसGirish Mahajanगिरीश महाजन