शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Kasba Bypoll Elelction Result: कसब्यातील पोटनिवडणूकीची लढत अत्यंत चुरशीची; धंगेकर विजयी, मग कुठं कमी पडले रासने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 14:57 IST

हेमंत रासनेंच्या प्रभागात आघाडी मिळूनही धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही.

पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर अनेकांनी नोटाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले आहे. १ हजार ३९७ मतदारांनी नोटा मतदान केले आहे. रासनेंना त्यांच्या प्रभागातून आघाडी मिळण्याच्या विश्वास होता. तो या निवडणुकीत खरा ठरला. मात्र हि आघाडी धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. तर इतर प्रभागात धंगेकर सातत्याने आघाडीवर राहिल्याने अखेर धंगेकरांचा विजय झाला. 

कसबा विधानसभा संघात सहा प्रभागातून मतदान झाले. प्रभाग क्रमांक १५ हा हेमंत रासनेंचा प्रभाग होता. त्यामधून त्यांची आघाडी होती. परंतु ती रवींद्र यांना मागे पाडण्यासाठी फारशी उपयोगी पडली नाही. तर प्रभाग क्रमांक १६, १७, १८, १९, २९ यामधून धंगेकरच आघाडीवर राहिल्याने त्यांचा विजय झाला. रासने आणि त्यांच्या समर्थकांनी १० ते १५ हजारांच्या मतांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. परंतु निवडणुकीच्या पहिल्या पाच फेऱ्यांमध्येच हा फोल ठरल्याचे दिसून आले. वीस फेऱ्यांमध्ये अखेरपर्यंत रवींद्र धंगेकरच आघाडीवर राहिले.    

जाणून घ्या प्रभागनिहाय आकडेवारी 

कसबा विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारक उतरविले होते. मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस पुण्यात ठाण मांडुन बसले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे १० वेळा पुण्यात आले होते. तसेच महाविकास आघाडीकडूनही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते प्रचारासाठी पुण्यात येत होते. भाजपने तब्बल ३० वर्षानंतर कसबा मतदारसंघ गमावला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीची देशभर चर्चा झाली. आता येणाऱ्या महापालिका आणि लोकसभेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटणार का? याबाबत राजकीय वर्तुळात सवाल उपस्थित केले जात आहेत.  

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणElectionनिवडणूक