शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मामा तुमच्या व पाटलांच्या पक्षांची राज्यात युती; मात्र आम्ही कुठे आम्हालाच माहिती नाही - महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 16:15 IST

दोन्ही मोठ्या नेत्यांच्या मदतीने बाबीर देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही

कळस : भरणेमामा तुमच्या व हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांची राज्यात युती आहे. मात्र आम्ही कुठे आहोत आम्हालाच माहिती नाही. तुम्ही दोघे आज मांडीला मांडी लावून बसला आहात. मी शेजारी बसलोय तरीपण दोघांनाही हाताला धरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे घेऊन जाईल व बाबीर देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही अशी राजकीय टोलेबाजी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावली.

इंदापूर तालुक्यातील राजकीय आखाड्यात विळ्या-भोपळ्याचे वैर असलेले आमदार दत्तात्रेय भरणे, व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी सभापती प्रवीण माने हे बाबीर मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान एकाच व्यासपीठावर आले होते. मंदिराच्या कामासाठी देणगी जाहीर करण्यावरून या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.  यावेळी रासपचे अध्यक्ष जानकर म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचे थेट दिल्लीत चांगले संबंध आहेत. आता ते मोदी, शहांच्या जवळ जाऊन बसतात. तर भरणे यांचा फोन गेला की अजितदादा लगेच फाईलवर सही करतात. अशा या दोन्ही मोठ्या नेत्यांकडून मंदिर कामासाठी जास्तीच्या निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले,आमची राज्यात युती असली तरी मी स्वतः सतेत नाही भरणे सतेत आहेत कोणाचही सरकार आले तरी ते सत्तेत असतात त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे  बाबीर देवाचा इतिहास भाविकांना कळला पाहिजे. बाबीर देव हे महादेवाचे रूप आहे व येथे सभेत महादेव उपस्थित आहेत. म्हणून आता निधीची कमतरता जाणवणार नाही. परंतू मंदिराच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे. वैयक्तिक पंधरा लाखांचा निधी देणार आहे

आमदार भरणे म्हणाले, सध्याची सभा राजकीय नसून देणगीदारांची देणगी जमा करण्यासाठी आहे. मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले असुन मंदिरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. माजी सभापती प्रवीण माने यांनी येथील रस्ता, सभामंडप कुस्ती आखाडा सभापती असताना मी पूर्ण केला असुन मंदिरासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण