शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

Pune: हनिट्रॅपला बळी पडलेल्या प्रकरणातील आरोपींना ठोकल्या बेड्या

By नितीश गोवंडे | Updated: August 19, 2023 16:28 IST

पोलिसांनी हनिट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तिघांचा तात्काळ शोध घेत अटक केल्याचे सांगितले...

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावरून एका अनोळखी महिलेचा फोन आला. संबंधित महिलेने गोड बोलत वारजे माळवाडी येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराला भेटण्यास बोलवले. मात्र त्या हॉटेलवर तक्रारदार आल्यानंतर त्याला सायबर पोलिस असल्याचे सांगत लुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राजन ज्ञानेश्वर कोल्हे (४६. रा. रावेत) यांनी याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी हनिट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तिघांचा तात्काळ शोध घेत अटक केल्याचे सांगितले. अक्षय राजेंद्र जाधव (२८, रा. कर्वेनगर), शिवाजी गोविंदराव सांगोले (३४, रा. नऱ्हे) आणि भरत बबन मारणे (४५, रा. रामनगर, वारजे) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा जी या महिलेच्या नावे असलेल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून कोल्हे यांना वारजे परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले होते. कोल्हे संबंधित हॉटेलमध्ये गेले असता तेथे अनाेळखी तीन जणांनी आपण सायबर पोलिस असल्याचे त्यांना सांगितले. तसेच तू मुलींना ट्रॅप करताे, तुझी चाैकशी करायची असल्याचे सांगून चाैकीला चल म्हणत, परिसरातील एका एटीएम सेंटरला घेऊन गेले. तेथे त्यांनी कोल्हे यांच्या एटीएमधून ५३ हजार ५०० रुपये काढून घेत पोबारा केला होता.दरम्यान तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांना तांत्रिक तपासाआधारे पोलिस अंमलदार अमोल सुतकर यांनी या प्रकरणाची संबंधित आरोपी हॉटेल स्वर्णा येथे असल्याची माहिती मिळाली, त्यावरून पोलिसांना अक्षय जाधव याला ताब्यात घेत, त्याच्या अन्य साथीदारांविषयी विचारणा केली. यानंतर पोलिसांनी शिवाजी सांगोले आणि भरत मारणे यांना अटक केली.

ही कामगिरी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलिस अंमलदार अमोल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे आणि राहुल हंडाळ यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ए. बी. ओलेकर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWarje Malwadiवारजे माळवाडी