शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: सवाई गंधर्व ७० व्या स्वरयज्ञाला आजपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST

प्रथम भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस. बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ. कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन होणार

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी (दि. १८) दुपारी ३ वाजता सवाईच्या ७० व्या स्वर यज्ञाला सुरुवात हाेणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे दि. १८ ते २२ डिसेंबरदरम्यान हा महोत्सव रंगणार असून, कार्यक्रमस्थळी सुमारे हजारो संगीतरसिकांना सामावून घेणाऱ्या भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी केली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून या महोत्सवाला सुरुवात होईल. प्रथम भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस. बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ. कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन होईल. यानंतर किराणा घराण्याचे गायक उस्ताद मुबारक अली खान आणि गायक सुधाकर चव्हाण यांच्या शिष्या व कन्या शाश्वती चव्हाण- झुरुंगे आपली गायनसेवा प्रस्तुत करतील. यानंतर आग्रा व जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक राम देशपांडे यांचे गायन होईल. व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे कर्नाटक शैलीतील वादन ऐकण्याची संधी यानंतर रसिकांना मिळेल. पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रबर्ती यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

महोत्सवास येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग केली आहे. तसेच मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अद्ययावत ध्वनियंत्रणा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारले आहेत. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत असे प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीतर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याचेही जोशी यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेBhimsen Joshiभीमसेन जोशीartकलाcultureसांस्कृतिकmusicसंगीतSocialसामाजिक