शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आकसातून थार जीप पेटवली; हवेली तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:27 IST

अज्ञातांनी  निवडणुक प्रचाराचा राग मनात धरुन गाडीवर पेट्रोल ओतून जीपला आग लावून पेटवून दिली आहे.

ठळक मुद्देअज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. 

उरुळी कांचन : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराचा राग मनात धरुन कोरेगाव मूळ (ता.हवेली ) येथे एका कार्यकर्त्याची महिंद्रा थार जीप पेट्रोलने पेटून देण्याचा प्रकार गुरुवार (दि.७) रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी  मंगेश सुरेश शितोळे( वय- ३५ , रा.इनामदार वस्ती , कोरेगाव मूळ , ता.हवेली ) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या मालकीची महिंद्रा थार जीप आगीत पूर्ण भस्मसात झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कोरेगावमूळ येथे महिंद्रा थार जीप गुरुवारी ७ रोजी रात्री उभी केली होती. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी  निवडणुक प्रचाराचा राग मनात धरुन गाडीवर पेट्रोल ओतून जीपला आग लावून पेटवून दिली आहे. या आगीत जीप भस्मसात झाली असुन या मध्ये चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

निवडणूक काळात घडलेल्या या सुडाच्या घटनेचा पोलिसांनी अनेक मार्गांनी तपास सुरू केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJeepजीपfireआग