शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कचरा वेचकांचे विविध मागण्यांसाठी 'थाली बजाओ' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:37 IST

शहरात एक आठवडा कचरावेचक पांढऱ्या रंगाचे “शोषणापासून मुक्ती” पट्टे बांधून काम करणार आहे.

ठळक मुद्दे पुणे महापालिका हद्दीत सुमारे साडेसात हजार कचरा वेचक करतात काम १७ व १८ ऑगस्टला पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह ठिकठिकाणी “थाली बजाओ” आंदोलन

पुणे : महापालिका प्रशासनाने कचरा वेचकांना विमा सरंक्षण द्यावे, घरटी कचरा गोळा करण्याचा दर काही महिन्यांसाठी वाढवावा, झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने ३० रुपये द्यावेत. आदी मागण्यांसाठी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, कागद ,काच, पत्रा कष्टकरी पंचायतीने महापालिका भवनासह शहरात विविध ठिकाणी ' थाली बजाओ' आंदोलन करण्यात आले. कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर महापौर, आयुक्त कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे उत्पन्न घटले आहे. सेवाशुल्क निम्म्यावर आले आहे. कचऱ्यातून मिळणारे कागद, पत्रा, प्लॅस्टिक सारख्या वस्तू विकून काही हातभार लागायचा, परंतु कचऱ्यातून या वस्तु गायब झाल्याने ते उत्पन्न ही घटले आहे. त्यातच केंद्र सरकारने २०१८ मध्ये आम आदमी विमा योजना बंद केली आहे. महापालिका या विम्याचा हप्ता भरायची. त्यामुळे मागील दोन वर्षात मरण पावलेल्या कचरा वेचकांच्या वारसांना पालिकेने विम्याची रक्कम हस्तांतरित करावी. महापालिका हद्दीत सुमारे साडेसात हजार कचरा वेचक काम करत आहेत. त्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच पालिकेने द्यावे. १ एप्रिल २०२० पासून ही योजना लागू व्हावी. तसेच कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या सर्व कचरावेचकांना सरकारी नियमांप्रमाणे आयुर्विम्याचे लाभ द्यावा, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

 ------ 

१४ ऑगस्टपासून शहरात एक आठवडा कचरावेचक पांढऱ्या रंगाचे “शोषणापासून मुक्ती” पट्टे बांधून काम करत असून १७ व १८ ऑगस्टला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह ठिकठिकाणी विकेंद्रित पद्धतीने “थाली बजाओ” आंदोलन करणार आहेत,अशी माहिती यावेळी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस