शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By विवेक भुसे | Updated: July 19, 2023 15:54 IST

राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत

पुणे : राजस्थानमध्ये बॉम्ब बनविण्याचे साहित्य जमा करुन बॉम्बस्फोटाची साखळी तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणेपोलिसांनी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार न्यायालयात हजर केले. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने त्यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले राजस्थानमधील दोन अतिरेकी गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात लपवून बसले असल्याचे उघडकीस आले आहे. एका वाहन चोरीच्या प्रकरणात नाकाबंदीच्या दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असताना ते फरार अतिरेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.इम्रान खान आणि मो़ युनूस साकी (रा. रतलाम, मध्यप्रदेश)अशी या दोन संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी माहिती दिली. कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणे तीन वाजता त्यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर त्यांना घरझडतीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता.

त्यांच्याकडे सायंकाळी चौकशी केली जात असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्याकडील लॅपटॉपची तपासणी केल्यावर ते देत असलेली माहिती आणि त्यातील कागदपत्रे यात विसंगती आढळून आली. त्यामुळे हे दोघेही देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने शहर पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला कळविली. एटीएसचे पथकही कोथरुड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर या दोघांना शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आणण्यात आले. स्वत: पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा ते मुळचे राजस्थानमधील असून चितोढगड या ठिकाणी एनआयएने कारवाई केली होती.  त्यात काही स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात हे तिघे संशयित होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींनी त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांना पकडणार्‍यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असल्याची माहिती समोर आली. राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसCourtन्यायालय