पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST2021-02-16T04:12:37+5:302021-02-16T04:12:37+5:30

हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जुन्नर शहर शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज यांच्या शिल्पासमोर ...

In the terrorist attack at Pulwama | पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात

हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जुन्नर शहर शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज यांच्या शिल्पासमोर मेणबत्त्या प्रजवलीत करून श्रद्धांजली अर्पण केली.

नगराध्यक्ष शाम पांडे यांनी पुलवामा येथील हल्ल्याचा घटनाक्रम सांगताना सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याचे, धाडसाचे कौतुक केले. उपतालुकाप्रमुख आविनाश करडीले , शहर प्रमुख चंद्रकांत डोके, उपशहरप्रमुख समीर मुलाणी, गटनेते समीर भगत, नगरसेवक नरेंद्र तांबोळी, विकी गोसावी, अमोल बनकर, जितेद्र पुराणिक, संदेश बारवे, ओंकार जोशी, दिनेश परदेशी, सचिन शिंदे, गणेश शिंदे, नितिन गुजराती आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक नरेंद्र तांबोळी यांच्या संकल्पनेतून या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

-

फोटो क्रमांक : १५ जुन्नर दहशतवादी हल्ला

फोटो ओळ : जुन्नर शहर शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज यांच्या शिल्पासमोर मेणबत्त्या प्रजवलीत करून श्रद्धांजली अर्पण केली

Web Title: In the terrorist attack at Pulwama