शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Accident: इंदापूरात सणसर येथे जीपचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 21:04 IST

इंदापूरच्या सणसर येथे महिंद्रा थार जीप सरबत पिण्यासाठी थांबलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर गेल्याने गंभीर अपघात झाला

सणसर : इंदापूरच्या सणसर येथे महिंद्रा थार जीप सरबत पिण्यासाठी थांबलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर गेल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात चालकासह चार जण  गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

याविषयीची सविस्तर माहिती अशी की, बारामती इंदापूर मार्गावर सणसर येथे पाचच्या दरम्यान महिंद्रा कंपनीची थार गाडी इंदापूरच्या दिशेने चालली होती. मात्र सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर ही जीप अचानक पणे रस्त्याच्या विरुद्ध बाजूला वळाली. ही जीपने समोरच असलेल्या सरबताच्या दुकानात बसलेल्या तीन जणांना या गाडीने उडविले. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले. 

जखमींमध्ये सणसर येथील किरण कुलकर्णी व त्यांच्या पत्नी कल्याणी कुलकर्णी, अमृत निंबाळकर यांचा समावेश आहे. चौथ्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे .तर गाडीचा चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात इतका गंभीर होता की काही कळायच्या आत जीपने तिघांना उडवले. दोन दुचाकींना उडवत  प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली.त्यात संरक्षक भिंत पडली. गावातील तरुणांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

मात्र ,सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व अन्य कर्मचारी उपस्थित नसल्याने जखमींना तात्काळ मदत मिळाली नाही. परंतु तेथे डॉक्टरांसह कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना बारामतीला हलविण्यात आले. दवाखान्यातील या बेशिस्त कर्मचाऱ्यांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याला जबाबदार कोण असे म्हणत सणसर चे माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना मोबाईलवर संपर्क साधुन घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान,रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोेणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :IndapurइंदापूरAccidentअपघातhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर