शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन चालकांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 12:31 IST

अपघात झाल्यानंतर ट्रकचालक अपघाताची खबर पोलीसाना न देता, जखमीना वैद्यकीय मदत न देता पळुन गेला आहे.

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर थांबलेल्या पिकअपला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे झालेल्या तीन गाड्यांच्या विचित्र अपघातात पिकअप व ईर्टिका चालक मृत्यूमुखी पडले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

या अपघातात पिकअप चालक ओमकार दत्तात्रय पाळेकर (वय २३) व  रा ता. माढा, जि. सोलापूर व इर्टिका चालक सुनिल भिमराव पवार (वय ४०, रा फुलचिंचोली ता पंढरपुर जि सोलापुर) हे दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. तर मंगेश बकट खोचरे (वय २२) व सर्फराज खलीद जहागीरदार (वय २३, दोघेही ता. माढा, जि. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रोहीत शंकर गोसावी वय १७, रा दहीवळी गाव निमगाव रोड, एमएसईबी कार्यालयाजवळ, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पळून गेलेल्या ट्रकचालकाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सचिन खोचरे यांचे कलींगड गुलटेकडी पुणे येथे विक्री करण्याकरिता आले होते. खोचरे यांच्यासमवेत रोहीत गोसावी, सर्फराज जहागीरदार व ओमकार दत्तात्रय पाळेकर पिकअप मधून निघाले. त्यावेळी पिकअप ओमकार चालवत होता. 

रात्री ११ वाजण्याच्या सुमारांस ते सोलापुर पुणे महामार्गावरून कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रॅड 11 हॉटेल समोर आली. त्यावेळी पुढे असलेल्या इर्टिका कार क्रमांक एमएच डीई ९०१८ च्या पुढे वाहणे थांबलेली असल्याने इर्टिका कारचालक पवार यांनी ब्रेक लावला. त्यामुळे पिकअप चालक पाळेकर यांनीही गाडी थांबवली. यावेळी दोन्ही गाड्या एकमेकांना घासल्या म्हणून सर्वजण खाली उतरुन पाहणी करीत होते. त्याचवेळी अचानक मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाहिले असता त्यांना सिमेंटच्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक देऊन इरटिगा वाहनास धडक दिल्याने पाळेकर, खोचरे, जहागीरदार हे जखमी झाल्याचे दिसले. 

 त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल येथे नेले असता पाळेकर यास डॉक्टरांनी तपासुन दाखल मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघातात जहागीरदार यास डोक्यास, उजव्या भुवईजवळ, छातीस तर खोचरे यास अंगावर खरचटलेले असुन पायास मार लागलेला आहे. तसेच चालक पवार यांना ससुन रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले.  अपघात झाल्यानंतर ट्रकचालक अपघाताची खबर पोलीसाना न देता, जखमीना वैद्यकीय मदत न देता पळुन गेला आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल