शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न :प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:58 IST

निवडणूका जवळ आल्याने कॉलेज स्फोटांची केंद्र होवू नये.....

ठळक मुद्देयापुढील काळात मित्र देखील तावून सुलाखून तपासणार भाजपाकडून समाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न

पुणे : गेल्या लोकसभा निवणुकांमध्ये विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात रिअ‍ॅक्ट झाला होता. तरुणांचा उठाव झाला तर त्यांना नियंत्रित करणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टेरेराईस करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच निवडणूका जवळ आल्याने कॉलेज स्फोटांची केंद्र होवू नये, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.      या अघोषित महा-आणीबाणीला विरोधात आम्ही सारे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील आणि बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. विश्वास उटगी आदी यावेळी उपस्थित होते.          अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, तरुणांना बळी करून फॅसिझम येण्याचा मार्ग सोपा करण्यात येत आहे. तरुणांच्या माध्यमातून होणा-या या अंतर्गत स्फोटाला रोखायचे असेल तर आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. तर बाह्य धोके रोखण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणेवर आहे. न्यायमूर्ती सावंत म्हणाले,  भाजपा हा आरएसएसचा राजकीय अवतार आहे. सामाजिक नीतीमुल्ये पायदळी तुडवून देशात व्यापारी मूल्ये स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे लोकशाहीचे रुपांतर धनिकशाहीत होत आहे. पाप बिना लक्ष्मी नही, लक्ष्मी बिना सत्ता नही असे सुत्र आहे. त्यामुळे देशात साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. आम्ही सत्याग्रही आहोत, हत्याग्रही नाही. हत्येचे विशेष अधिकार इतरांना दिला आहे. धर्मनिरपेक्ष संघटना एकत्र करून दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्यात येणार आहे.       न्यायमुर्ती कोळसे -पाटील म्हणाले, नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याची क्षमता देशात आहे. मात्र, ही ताकद मूठभर लोकांच्या हाती गेली आहे. निरापराध लोकांना न सोडणारे मोदी, शहा आम्हाला सोडतील असे वाटत नाही. साथ देवू म्हणणारे आमचे काही मित्र आरएसएसला जावून मिळाले. त्यामुळे  यापुढील काळात मित्र देखील तावून सुलाखून तपासणार आहोत. ...................समाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न विविध संघटनांना एकत्र घेवून भाजपा आणि आरएसएसला विरोध करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे. भाजपाकडून सामाजवादी संघटनांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्याअर्थी सिंचन घोटाळा खटल्याचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दोन विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करते त्याअर्थी शासनाची प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करत असल्याचे स्पष्ट होते, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाStudentविद्यार्थी