चंचलाताई संदीप कोद्रे क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:55+5:302021-02-05T05:21:55+5:30

पुणे : मुंढवा येथील चंचलाताई संदीप कोद्रे क्रीडा संकुल येथे टेनिस कोर्टाचे उद्घाटन माणिकचंद ऑक्सिरिचच्या कार्यकारी संचालिका जानव्ही धारिवाल ...

Tennis court at Chanchalatai Sandeep Kodre Sports Complex | चंचलाताई संदीप कोद्रे क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट

चंचलाताई संदीप कोद्रे क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट

पुणे : मुंढवा येथील चंचलाताई संदीप कोद्रे क्रीडा संकुल येथे टेनिस कोर्टाचे उद्घाटन माणिकचंद ऑक्सिरिचच्या कार्यकारी संचालिका जानव्ही धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

क्रीडा संकुलाचे संचालक संदीप कोद्रे, तेजस कोद्रे, संस्थापक मिलिंद पवार, लिजंडस् स्पोर्टस् क्लबचे सरव्यवस्थापक विनायक सूर्यवंशी, टेनिस प्रशिक्षक अभय शर्मा आदी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी जानव्ही धारिवाल म्हणाल्या की, कोविड-१९ या महामारीनंतर प्रत्येकालाच जीवनातील शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व पटले आहे. या संकुलातील टेनिसच्या सुविधेमुळे या भागातील मुले आणि मुलींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा संकुलामध्ये नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे संदीप कोद्रे यांनी सांगितले. यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि राष्ट्रीय दर्जाचे जलतरण सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Tennis court at Chanchalatai Sandeep Kodre Sports Complex