शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भाडेकरूंमध्ये परप्रांतीय नागरिक, कुख्यात गुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:35 PM

चाकण परिसर : घरमालकांचे दुर्लक्ष, पोलीस सतर्क

आंबेठाण : औद्योगिकरणामुळे चाकण परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहणारे परप्रांतीय कामगार लोकांच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याला हजारो रुपये कमवायच्या नादात घरमालकांनी असामाजिक प्रवृत्तींना नकळत थारा दिल्यामुळेच पुन्हा एकदा भाडेकरूंमध्ये परप्रांतीय नागरिक विविध गुन्ह्यांतील नामचीन गुन्हेगार असल्याचे मागील तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या पुलवामामधील संशयित दहशतवादी व एक बांगलादेशी घुसखोर यांना वासुली व खालुंब्रे येथून ताब्यात घेतल्याने ही बाब उघड झाली आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रामुळे येथील अनेक गावांना सुगीचे दिवस आले आहेत. कंपनीत काम करण्यासाठी स्थानिक तरुणांपेक्षा परराज्यातील तरुणांचा भरणा अधिक होऊ लागल्याने त्यांच्या राहण्याची सोय व्हावी व आपल्याला दोन पैसे फायदा होईल, अशा हिशेबाने येथील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने खोल्या बांधून त्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मात्र या खोल्यांमध्ये कोण राहतो, याची साधी चौकशी करण्याची तसदी घेत नसल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यांसह अनेक बांगलादेशी तरुण गुन्हेगार गुन्हे करून येऊन येथील मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात भाड्याच्या खोलीत राहत आहेत.नव्याने दाखल झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने कडक सूचना देऊन चाकण औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अस्थायी बांधकाम मजूर व गावांमधील राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती गोळा करण्यासाठी मोठे प्रयत्न केले; परंतु त्यात म्हणावे तसे पोलिसांना यश मिळाले नाही. त्यामुळे येणाºया काळात चाकण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अशा नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.४चाकण औद्योगिक परिसरातून पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवादी शरियत मंडल (वय १९) व बांगलादेशी घुसखोर सागरअली रफिकअली (वय २२) या दोघांना अटक करण्यात आली आहे.चाकणसह बिरदवडी, आंबेठाण, सावरदरी, भांबोली, चिंबळी, मोई, कुरुळी, वासुली, खालुंब्रे, शिंदे, वराळे आदी गावातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना दिली नसेल तर ती द्यावी. त्यामुळे नकळत अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा मिळणार नाही. नुकतेच एमआयडीसीमधील कारखान्यातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये कंपनीतील लेबर ठेकेदाराने त्यांच्याकडील कामगारांचे ओळखपत्र, फोटो स्वत:कडे ठेवावे व त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे. तसेच विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत.- सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे

टॅग्स :Puneपुणे