भाडेकरूंमध्ये परप्रांतीय नागरिक, कुख्यात गुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:35 IST2019-03-31T23:35:11+5:302019-03-31T23:35:36+5:30
चाकण परिसर : घरमालकांचे दुर्लक्ष, पोलीस सतर्क

भाडेकरूंमध्ये परप्रांतीय नागरिक, कुख्यात गुंड
आंबेठाण : औद्योगिकरणामुळे चाकण परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहणारे परप्रांतीय कामगार लोकांच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याला हजारो रुपये कमवायच्या नादात घरमालकांनी असामाजिक प्रवृत्तींना नकळत थारा दिल्यामुळेच पुन्हा एकदा भाडेकरूंमध्ये परप्रांतीय नागरिक विविध गुन्ह्यांतील नामचीन गुन्हेगार असल्याचे मागील तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या पुलवामामधील संशयित दहशतवादी व एक बांगलादेशी घुसखोर यांना वासुली व खालुंब्रे येथून ताब्यात घेतल्याने ही बाब उघड झाली आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रामुळे येथील अनेक गावांना सुगीचे दिवस आले आहेत. कंपनीत काम करण्यासाठी स्थानिक तरुणांपेक्षा परराज्यातील तरुणांचा भरणा अधिक होऊ लागल्याने त्यांच्या राहण्याची सोय व्हावी व आपल्याला दोन पैसे फायदा होईल, अशा हिशेबाने येथील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने खोल्या बांधून त्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मात्र या खोल्यांमध्ये कोण राहतो, याची साधी चौकशी करण्याची तसदी घेत नसल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यांसह अनेक बांगलादेशी तरुण गुन्हेगार गुन्हे करून येऊन येथील मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात भाड्याच्या खोलीत राहत आहेत.
नव्याने दाखल झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने कडक सूचना देऊन चाकण औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अस्थायी बांधकाम मजूर व गावांमधील राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती गोळा करण्यासाठी मोठे प्रयत्न केले; परंतु त्यात म्हणावे तसे पोलिसांना यश मिळाले नाही. त्यामुळे येणाºया काळात चाकण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अशा नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
४चाकण औद्योगिक परिसरातून पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवादी शरियत मंडल (वय १९) व बांगलादेशी घुसखोर सागरअली रफिकअली (वय २२) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
चाकणसह बिरदवडी, आंबेठाण, सावरदरी, भांबोली, चिंबळी, मोई, कुरुळी, वासुली, खालुंब्रे, शिंदे, वराळे आदी गावातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना दिली नसेल तर ती द्यावी. त्यामुळे नकळत अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा मिळणार नाही. नुकतेच एमआयडीसीमधील कारखान्यातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये कंपनीतील लेबर ठेकेदाराने त्यांच्याकडील कामगारांचे ओळखपत्र, फोटो स्वत:कडे ठेवावे व त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे. तसेच विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत.
- सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे