पाटस: दौंड तालुक्यातील पाटस घाटात टेम्पोने ट्रकच्या पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर आठ जखमी झाल्याची घटना काल मध्यराञीच्या सुमारास घडली. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली. सईद शेख (वय १९ रा. पुणे ) या युवकाचा ह्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शबाना भेळमे ( वय ४० ) नबी भेळमे ( वय ४५) कसक भेळमे ( वय १६ ) पैगंबर भेळमे (वय १३ सर्व रा भवानी पेठ, पुणे) तफिसा शेख, समीरा शेख, महेक शेख, ( सर्व राहणार अप्पर सरगम चाळ पुणे ) वाहन चालक अमीन मुजावर ( वय २३ ) हे सर्व या अपघातात जखमी झाले आहेत. वरील सर्व व्यक्ती टेम्पोने पुण्याहून सोलापूरला लग्नासाठी निघाले होते. दरम्यान पुणे - सोलापूर महामार्गावर पाटस -- कुरकुंभ घाटात एका ट्रक डिझेल संपल्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या मध्यभागी ऊभा होता. तर घाटात सर्वञ अंधार होता. यावेळी टेम्पोला अंधारात ट्रक न नसल्याने टेप्मोने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोठा अपघात झाला. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. याप्रसंगी जखमींना दौंड येथील रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यातील सईद शेख याचा उपचारापूर्वीच मुत्यु झाला. अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दौंड तालुक्यातील पाटस घाटात टेम्पोची ट्रकला धडक! अपघातात १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 15:49 IST
मध्यरात्री घडली ही घटना, एक जण ठार तर आठ जखमी
दौंड तालुक्यातील पाटस घाटात टेम्पोची ट्रकला धडक! अपघातात १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
ठळक मुद्देअपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात