शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पोला लागलेल्या आगीत टेम्पो आणि पुठ्ठे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:36 IST

आळेखिंडी परिसरात मंगळवार मध्यरात्रीची घटना

आळेफाटा (पुणे) : पुठ्ठे घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला अचानकपणे आग लागली. या दुर्घटनेत टेम्पो व पुठ्ठे जळून खाक झाले. पुणे- नाशिक महामार्गावर आळेखिंडी परिसरात मंगळवार (दि 26) मध्यरात्री ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, पुणे बाजूने नाशिककडे पुठ्ठे घेऊन जाणारा मालवाहू टेम्पोला (क्र. एम. एच. 04 ई. एल. 7734) पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्यापासून पाच किलोमीटर असलेल्या जिल्हाचे सरहद्दीवरील आळेखिंडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. टेम्पोत पुठ्ठे असल्याने पाहता पाहता ही आग पसरत गेली व यामुळे हा टेम्पो जळून खाक झाला. टेम्पोला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले वाहन थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी योग्य सूचना दिल्या व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.

नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या चौपदरीकरण रस्तावरील वाहतूक एकेरी वळवली आहे. आग कशामुळे लागली व किती नुकसान झाले याची माहिती समजू शकली नाही. पुणे नाशिक महामार्गावर वाहनांना आगी लागण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNashikनाशिक