शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टेंपल रोझच्या संचालक मायलेकींना हैदराबादहून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 18:56 IST

गेले वर्षभर पसार असलेल्या टेम्पल रोझ कंपनीच्या संचालक मायलेकींना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हैद्राबाद येथे अटक करण्यात आली.

पुणे : भूखंडात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने पुणे, मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील ७ हजार गुंतवणुकदारांची ४०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गेले वर्षभर पसार असलेल्या टेम्पल रोझ कंपनीच्या संचालक मायलेकींना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हैद्राबाद येथे अटक करण्यात आली.

    वनिता देवीदास सजनानी (वय ५८) आणि दीपा देवीदास सजनानी (वय ३४, दोघी रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या मायलेकींची नावे आहेत. भूखंडात गुंतवणुकीच्या आमिषाने मुख्य संचालक देवीदास सजनानी आणि त्याच्या साथीदारांनी राज्यातील सात हजार गुंतवणूकदारांना गंडा घातला होता.  याप्रकरणी टेम्पल रोझचा मुख्य संचालक देवीदास सजनानी (वय ६७) याच्यासह ६ जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.  त्यापैकी दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.  टेम्पल रोझचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पिंगोरी गावात भूखंडात गुंतवणुकीचे आमिष या कंपनीकडून दाखविण्यात आले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ, असे सांगण्यात आले होते. पुणे, मुंबईसह राज्यातील ७  हजार गुंतवणुकदारांनी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

    फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्या होत्या. मुंबईतही सजनानी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमाअंतर्गत (एमपीडीए) दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रशासनाने टेम्पल रोझच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती.  याप्रकरणात मालमत्ता जप्त करण्यात आली होती. न्यायालयाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जप्त मालमत्तेची माहिती देण्यात आली आहे. या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. टेम्पल रोझच्या संचालक वनिता आणि दीपा या गेल्या वर्षभरापासून फरार होत्या. त्यांचा पुणे आणि मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. दोघी हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघींना ताब्यात घेतले. 

श्रीलंकेतून बॅंकाॅंकला पसार हाेण्याचा हाेता त्यांचा विचार 

    वनिता सजनानी आणि तिची मुलगी दीपा पसार झाल्यानंतर म्हैसुर, गोवा, बंगळुरू, हैद्राबाद येथे नाव बदलून वास्तव्य करत होत्या. तपासधिकारी पोलीस निरीक्षक रौफ शेख यांना दोघी हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक गणेश विसर्जनचा बंदोबस्त असताना गेल्या रविवारी हैद्राबादला रवाना झाले. दोघींना ताब्यात घेतले. दोघींना पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्हयात जामीन मंजूर करण्यात आला आहे. सजनानी मायलेकींना तपासासाठी मुंबईत दाखल असलेल्या गुन्हयात ताब्यात देण्यात आले आहे. दोघी श्रीलंकेतून बँकाँकला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. दोघींनी बनावट नावाची ओळखपत्र तयार केल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसfraudधोकेबाजी