मुळशीतील गावांसाठी टेमघर प्रादेशिक योजना - जानकर
By Admin | Updated: July 4, 2017 03:19 IST2017-07-04T03:19:50+5:302017-07-04T03:19:50+5:30
मुळशी तालुक्यातून जात असलेल्या जालना ते दिघी बंदर या राज्यमार्गाच्या बांधणीसाठी शासनाने ९०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. चांदणी चौक ते

मुळशीतील गावांसाठी टेमघर प्रादेशिक योजना - जानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पौड : मुळशी तालुक्यातून जात असलेल्या जालना ते दिघी बंदर या राज्यमार्गाच्या बांधणीसाठी शासनाने ९०० कोटी रुपयांची तरतूद
केलेली आहे. चांदणी चौक ते ताम्हिणी या रस्त्याच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात करण्यात येणार आहे. रावडे फाटा ते भादस या शिल्लक राहिलेल्या रस्त्याच्या कामाची सुरुवातही लवकरात लवकर करण्यात येणार असून, मुळशी तालुक्याच्या पूर्व भागातील २२ गावांसाठी टेमघर प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून पुढील अधिवेशनात यासाठी लागणाऱ्या रकमेची
तरतूद केली जाणार असल्याची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी अकोले (ता. मुळशी) येथे दिली.
या वेळी आमदार बाळा भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे, अल्पना वरपे, छाया मारणे, रघुनाथ गौडा, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, विजय केदारी, माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पा ठोंबरे, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक साठे, कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, सरपंच सुजाता जाधव, ग्रामपंचायत सदस्य मारुती कुरपे, बाळासाहेब कुरपे,
रमेश चव्हाण, बाळासाहेब जाधव, नवनाथ पारखी, विनायक ठोंबरे, दत्तात्रय जाधव, विलास सातपुते उपस्थित होते.
या वेळी आमदार बाळा भेगडे, शरद ढमाले, दत्तात्रय टेमघरे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा नेते दत्तात्रय जाधव आणि विलास सातपुते यांनी
केले होते.
विकासकामांचे उद्घाटन
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन जानकर यांच्य हस्ते झाले. या वेळी रस्ता काँक्रिटीकरण, ग्रामपंचायतीच्या खर्चाने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन, वृक्षारोपण आणि १० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या वेळी झाला.